Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कपाशीच्या फ्युचर्स किमती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक (Cotton Market) शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. मागील वर्षी कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले होते. मात्र यंदा कापसाला साधारणपणे ८ हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा खर्चसुद्ध निघत नसल्याची परिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर कापूस बाजारात विक्री करावा कि बाजारभाव वाढतील या आशेवर साठवून ठेवावा असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे.

यंदा पुढील महिन्यात कापसाचे भाव वाढतील का? (Cotton Market)

कापसाचे बाजारभाव मागील वर्षीसुद्धा मार्च महिन्यापर्यंत होते. जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कापसाची विक्री केली होती. मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली होती त्यांना मागच्या वर्षीही ७ ते ८ हजार रुपये भाव मिळाला होता. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांना ११ हजार भाव मिळाला होता. यंदासुद्ध कापसाचे बाजारभाव वाढतील अशी शक्यता आहे. परंतु कापसाच्या दरामध्ये फार मोठी वाढ होणार नसल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे.

कापसाचे व कपाशीचे फ्युचर्स व्यवहार भारतात NCDEX व MCX एक्स्चेंजमध्ये कापसासाठी राजकोट हे डिलिवरी केंद्र आहे. सर्व किमती या डिलिवरी केंद्रासाठी आहेत. यवतमाळ व जालना (महाराष्ट्र), कडी व मुंद्रा (गुजरात) आदिलाबाद (तेलंगण) ही इतर डिलिवरी केंद्रे आहेत. कपाशीसाठीसुद्धा राजकोट हे डिलिवरी केंद्र आहे. सर्व किमती या डिलिवरी केंद्रासाठी आहेत. कपाशीची प्रत २९ एम. एम. आहे.

इतर तपशीलासाठी MCX च्या संकेत स्थळास भेट द्यावी. https://www.mcxindia.com
कापसाची किमत प्रती रु. ३५६ किलोची गाठ; कपाशीची किमत रु. प्रती २० किलो

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) ने 2022-23 हंगामासाठी कापूस पिकाच्या उत्पादनाचा अंदाज 9.25 लाख गाठींनी कमी करून 330.50 लाख गाठींवर आणला आहे. कारण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची अपेक्षा आहे.

भारत सरकारने आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA) अंतर्गत ऑस्ट्रेलियातून 51,419 MT एक्स्ट्रा लॉंग स्टेपल (ELS) कापूस (किमान 28 मिमी) शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑस्ट्रेलियाला अतिरिक्त लांब स्टेपल कापूस (किमान 28 मिमी) साठी भारताचा ड्युटी फ्री मार्केट प्रवेश आहे.

मार्केटिंग वर्ष 2023-24 साठी कापसाच्या जागतिक वापरामध्ये अंदाजित वाढ तसेच मोठ्या प्रमाणातील यूएस मधील पुरवठ्याचा परिणाम यूएस च्या वाढत्या निर्यातीत होतो . यूएस मिल वापरासह एकत्रित केल्यावर, एकूण मागणी अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि ending stock वाढून 5.3 दशलक्ष गाठी होण्याचा अंदाज आहे. 2023-24 मार्केटिंग वर्षात जागतिक ending stock 89.9 दशलक्ष गाठींवर किंचित कमी होण्याचा अंदाज आहे.

error: Content is protected !!