Cotton Market : कापसाचे वायदे 10 दिवसांत होणार सुरु; SEBI ने बंदी हटवल्याने कापसाचे दर वाढणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । Cotton Market कापसाच्या वायद्यांवर सेबी (SEBI) ने बंदी घातली होती. यामुळे कापसाच्या बाजारभावांवरही परिणाम झाला होता. यंदा कापसाला सर्वसाधारण 8000 रुपये प्रति क्विंटल असा भाव (Cotton Rate) मिळताना दिसतो आहे. मागील वर्षी हाच भाव जवळपास ११ हजार रुपये सुरु होता. कापसाचे बाजारभाव पडल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र आता सेबीने कापसाच्या वायद्यावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कापसाचे वायदे १० दिवसांत होणार सुरु होणार असल्याची माहिती मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) कडून देण्यात आली आहे. यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कापसाच्या वायद्यांवरील अटी आणि शर्थी बदलण्यासाठी सेबीने जानेवारी महिन्यात कापसाच्या वायद्यांवर बंदी घातली होती. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी MCX वरील कापूस वायदे सुरु न झाल्याने शेतकरी नाराज होते. मुंबईतील सेबी कार्यालयावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढून वायदे लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी देखील केली होती. त्यानंतर झालेल्या MCX च्या बैठकीत वायदे उठवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तांत्रिक गोष्टींची पूर्तता कारण्याकरत १० दिवसांचा कालावधी लागेल असे सांगून 13 फेब्रुवारी रोजी एप्रिल जून आणि ऑगस्ट महिन्यासाठीचे वायदे सुरु होतील अशी माहिती देण्यात आली आहे.

असे चेक करा घरबसल्या तुमच्या शेतमालाचे रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरी बसून महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव स्वतः चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. इथे सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री अशा अनेक सुविधा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून या शेतीउपयोगी सेवेचे लाभार्थी बना.

कापसाचे वायदे सुरु झाल्यावर कापूस बाजारभाव वाढतील का?

कापसाचे वायदे सुरु झाल्यामुळे सदर महिन्यांतील कापसाच्या दरांचा शेतकऱ्यांना अंदाज येतो. तसेच कापूस वायद्यांमुळे व्यापारी आणि उद्योगांना वायद्यांच्या माध्यमातून जोखिम व्यवस्थापन करणे सोपे जाते. परिणामी यामुळे कापसाचा व्यापार वाढतो. कापूस वायद्यामुळे नेहमीच कापसाचे भाव वाढतात असे नाही. मात्र यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात पारदर्शकता निर्माण होऊन बाजारभाव वाढण्यास पूरक स्थिती निर्माण होते. साध्याचे कापूस बाजारभाव पाहता वायदे सुरु झाल्यानंतर कापसाचे भाव थोड्या प्रमाणात का असेना वाढतील असे बोलले जात आहे.

MCX ने कापूस वायद्यांमधील अटी व शर्थींमध्ये केला बदल

कापूस वायद्यांमधील काही अटी व शर्थी बदलण्यासाठी सेबीने जानेवारी महिन्यातील वायद्यांवर बंदी घातली होती. आता आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अटी व शर्थींमध्ये बदल करण्यात आल्याचं MCX ने सांगितले आहे. कापूस वायद्यांच्या सिंबाॅल, डिस्क्रीप्शन, ट्रेडिंग युनिट, कोटेशन, कमाल ऑर्डर साईज, टिक साईज, डिलिवरी युनिट आणि सेंटर, गुणवत्ता स्पेसिफिकेशन आदींमध्ये बदल केला. हे बदल केल्यानं उद्योग आणि व्यापाऱ्यांना व्यवहार करणं सोपं जाईल, असं पीएसीच्या सदस्यांचं म्हणणं आहे.

महत्वाचा बदल म्हणजे एमसीएक्सवर आतापर्यंत गाठींमध्ये व्यवहार होत होते. मात्र यापुढे व्यवहार खंडीमध्ये होणार आहेत. एक खंडी जवळपास ३५६ किलोची असते. यापुर्वी २५ गाठींचे ट्रेडिंग युनिट होते. ते आता ४८ खंडीचे असेल. कमाल आॅर्डर साईजमध्येही बदल करण्यात आला. कमाल ऑर्डर साईज १२०० गाठींऐवजी ५७६ खंडी करण्यात आली.

error: Content is protected !!