Cotton Pick Up Burn : कापूस खरेदीस नकार; संतापलेल्या शेतकऱ्याने पीक अप पेटवली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Pick Up Burn) हमीभाव देखील मिळत नाहीये. अशातच आता वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर शेतकरी अमोल ठाकरे यांचा कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात आला. यावेळी संतापलेलया शेतकरी अमोल ठाकरे यांनी आपली भरलेली कापसाची गाडी पेटवून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर खरेदीसाठी जाचक नियम लागू करण्यात आले आहे. ज्यामुळे या शेतकऱ्याचा कापूस खरेदी करण्यास खरेदी केंद्राने नकार दिला होता. त्यामुळे आधीच भाव मिळत नसताना, सरकार कापूस देखील खरेदी करत नसल्याने शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल (Cotton Pick Up Burn) उचलल्याचे सांगितले जात आहे.

कापूस खरेदीस नकार (Cotton Pick Up Burn In Wardha)

वर्धा जिल्ह्यातील उंबरी येथे शेतकरी अमोल ठाकरे यांनी पीक अपमध्ये भरून आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. मात्र भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रावर त्यांच्या कापसाची पीक नोंदणी झाली नसल्याचे कारण देत कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात आला. ज्यामुळे सरकारच्या नियमांवर संपातलेले शेतकरी अमोल ठाकरे यांनी आगपेटी घेत आपले पीक अप वाहन कापसासह पेटवून (Cotton Pick Up Burn) दिले. ज्यावर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाणी टाकत आग विझविण्याचा प्रयत्न केला. अल्पावधीतच ही आग आटोक्यात आली. त्यामुळे होणारे नुकसान टळले. मात्र आता या घटनेनंतर कापूस दराचाच नाही तर कापूस खरेदीचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सरकारने या घटनेची योग्य दखल घेऊन, कापूस खरेदीसाठी अटींचे जोखाड कमी करून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप

दरम्यान, सध्या एखादी बाजार समिती वगळता राज्यातील कोणत्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळत नाहीये. राज्यात सध्या कापसाला सरासरी 6600 ते 6900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. काही ठिकाणी कापसाचे दर त्याहूनही कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील मिळणे मुश्किल झाले आहे. मागील दोन वर्ष शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळाला होता. मात्र वर्षभरापासून घसरलेले कापसाचे दर अजूनही सुधारण्यास तयार नसल्याने कापूस शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. 2021 मध्ये कापसाला 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. सध्या कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र साठवून तरी किती दिवस ठेवणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे

error: Content is protected !!