Cotton Rate : हुश्श! कापूस बाजारभाव वाढले! इथे मिळाला सर्वाधिक Rs. 8,800 दर; तुमच्या जिल्ह्यात काय भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक (Cotton Rate) शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. अखेर कापसाच्या बाजारभावात वाढ झाल्याचे दिसत आहे. आज महाराष्ट्रात कापसाला सर्वाधिक कमाल दर ८ हजार ८०० रुपये मिळाला आहे. कापसाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. देशातील कापूस आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून दरही चांगले मिळत असल्याने बाजारात तेजी आहे.

आज दिवसभर झालेल्या कापूस बाजारात राज्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजारसमितीत कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. अकोट येथे आज झालेल्या कापूस बाजारात तब्बल ८ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल आता भाव मिळाला आहे. राज्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये देखील कापूस बाजारभावात वाढ झाल्याचे चित्र आहे. कापसाचे किमान दर स्थिर असले तरी कमाल दरांमध्ये मात्र चांगली वाढ झाल्याने हे शेतकऱ्यांसाठी सुखद आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

देशातील वायदे

कापसाचे वायदे १३ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहेत. कापूस वायदे सुरु होण्यामुळे कापसाच्या दरांमध्ये तेजी दिसून येत आहे. आज एप्रिलच्या डिलिवरीच्या वायद्यांमध्ये १८० रुपयांची सुधारणा झाली होती. त्यामुळेच आज कापूस बाजारात तेजी दिसून आली.

कापसाचे भाव अजून वाढतील?

नुकतेच युएसडीएनं जागतिक कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. तर काॅटन असोसिएशन ऑफ इंडिनाने देशातील कापूस उत्पादन ३२१ लाख गाठींवर स्थिरावेल, असे सांगितले. येणाऱ्या दिवसांत कापसाचे बाजारभाव अजून वाढतील असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वधारले आहेत. भारतात कापसाचे बाजारभाव ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० यादरम्यान स्थिर राहतील असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

शेतमाल : कापूस (Cotton rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2023
सावनेरक्विंटल4100800081008050
मनवतक्विंटल2600760084558365
किनवटक्विंटल123790081508075
राळेगावक्विंटल4294800083008150
भद्रावतीक्विंटल492795082508100
समुद्रपूरक्विंटल1054780083508100
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल23755080608060
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल91770081507900
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1877790083508200
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल88790084008150
उमरेडलोकलक्विंटल763775081608050
देउळगाव राजालोकलक्विंटल900790082758000
वरोरालोकलक्विंटल1443710082507800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल687770082008000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल570755082508000
काटोललोकलक्विंटल85780081007900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल5018790083908130
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल219780081507975
error: Content is protected !!