Cotton Rate : पांढर सोन म्हणून कापसाला ओळखलं जात. भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन गुजरात राज्यात होते. अनेक शेतकरी कापसाची लागवड करून चांगला पैसा कमवतात. बऱ्याच शेतकऱ्यांनी सध्या कापूस घरात साठवणूक करून ठेवल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. कापसाला म्हणावे असे दर नसल्याने शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस साठवून ठेवला होता.
रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
मात्र सध्या पेरणीसाठी पैशांची गरज भासत असल्याने शेतकरी कापूस विकण्यासाठी बाजारसमितीमध्ये नेत असल्याचे दिसत आहे. सध्या कापसाच्या दरात दररोज 200 ते 300 रुपयांची चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसांच्या तुलनेत आज कापसाच्या दरात तेजी असून, देशातील विविध बाजारांमध्ये कापसाची आवक देखील वाढली आहे. चलातर मग जाणून घेऊया आज कापसाला किती बाजारभाव मिळाला. (Cotton Rate)
इथे चेक करा बाजारभाव –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला घरबसल्या कापूस किंवा इतर शेतमालाचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर लगेच प्ले स्टोअरला जा आणि Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव पाहायला मिळेल. त्याचबरोबर सरकारी योजना, हवामान अंदाज, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री, इत्यादींची माहिती तुम्हाला अगदी मोफत मिळेल.
आजच्या दिवसात कापसाचा बाजारभाव ६००० ते ७००० रुपयांपर्यंत दिसून येत आहे. सिंदी(सेलू, यावल, हिंगणघाट, काटोल, सावनेर या ठिकाणी कापसाला ६००० ते ७००० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. कापसाला जास्त भाव मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कापूस आहे त्या भावामध्ये विकायला सुरवात केली आहे.
शेतमाल : कापूस (Cotton Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/07/2023 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 700 | 6900 | 6925 | 6925 |
काटोल | लोकल | क्विंटल | 90 | 6600 | 7000 | 6800 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1100 | 6500 | 7140 | 6800 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 40 | 5980 | 6650 | 6380 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 260 | 7100 | 7295 | 7200 |