हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकरी अजूनही बाजारभाव वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत. कापसाला मागील वर्षी ११ हजार रुपये भाव मिळाला होता. यंदा मात्र ८ हजार रुपये भाव मिळत असल्याने यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आजही कापसाला विशेष भाव मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.
आज दिवसभरात सिंदी (सेलू) येथे कापसाला राज्यातील सर्वाधीक 8 हजार 285 रुपये इतका भाव मिळाला. सिंदी येथे माध्यम स्टेपल कापसाची २ हजार २०० क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी 8150 रुपये तर जास्तीत जास्त 8285 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच सावनेर येथे राज्यात सर्वाधिक कापसाची आवक नोंद झाली. सावनेर येथे आज 2400 क्विंटल कापूस आवक झाली असून यावेळी 7950 रुपये भाव मिळाला.
बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा
शेतमाल : कापूस (Cotton Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
07/04/2023 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 2400 | 7600 | 7950 | 7850 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 700 | 7600 | 7950 | 7850 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 600 | 7400 | 8130 | 8080 |
वरोरा | लोकल | क्विंटल | 843 | 7000 | 8115 | 7500 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 628 | 7000 | 8100 | 7500 |
काटोल | लोकल | क्विंटल | 120 | 7000 | 8000 | 7850 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 2200 | 8150 | 8285 | 8200 |