हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : शेती व्यवसायात इतर पिकांप्रमाणे कापूस एक महत्वपूर्ण पीक आहे. कापसाच्या दरात प्रतिक्विंटल आवकामागे आज ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत जवळपास 80 टक्के कापूस विक्री झाला आहे. येत्या काही दिवसांत बाजारातील आवकामध्ये बदल होऊन कापसातील तेजी वाढेल असा अंदाज व्यापारी विश्लेषक करत आहेत. कापसाचे भाव ९ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा
शेतकऱ्यांनी एकूण ८० टक्के कापूस आतापर्यंत विकला आहे. अजून २० टक्के कापूस हा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. तसेच पुढील एक – दोन आठवड्यात उर्वरित कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे. दरवर्षी शेतकरी पिकांचे दर वाढण्याच्या प्रतीक्षेत असतात. परंतु प्रतीक्षा करून शेतकरी बाजारात कापूस विकण्यास आणतात. कापसाचा साठा पूर्ण संपत आल्यानंतर कापसाच्या दरात थोडीफार वाढ होते. हे बऱ्यापैकी सर्वच पिकांबाबत पहायला मिळते.
असा मिळवा पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव
शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुमाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे तुमाला यासोबत अनेक शेतीउपयोगी गोष्टी अगदी मोफत मिळतात. यामध्ये सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा आहेत.
आजच्या प्रतिक्विंटल कापसाची आवक आणि बाजारभावाचा विचार केला तर हिंगणघाट बाजारसमितीत कापसाची एकुण आवक १०,३३१ क्विंटल झाली आहे. हिंगणघाट येथे कापसाला राज्यातील सर्वाधिक ८ हजार २९० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तर किनवट शेती उत्पन्न बाजारसमितीत कापसाची राज्यातील सर्वात कमी 43 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तसेच उर्वरित पिकांच्या बाजारभावाची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील तक्त्यात पिकांचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत.
शेतमाल : कापूस (Cotton Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
08/04/2023 | ||||||
सेलु | — | क्विंटल | 2265 | 6400 | 8300 | 8230 |
किनवट | — | क्विंटल | 43 | 7500 | 8000 | 7750 |
भद्रावती | — | क्विंटल | 360 | 7000 | 8100 | 7550 |
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 808 | 7700 | 8200 | 8000 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 620 | 7500 | 7950 | 7800 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 936 | 7500 | 8040 | 7850 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 420 | 7200 | 8150 | 7500 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 360 | 7800 | 8150 | 8000 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 10331 | 7500 | 8290 | 7860 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 750 | 8050 | 8275 | 8200 |