हॅलो कृषी ऑनलाईन । देशात कापूस (Cotton) हे नगदी पीक अनेक राज्यांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाडा भागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण (Economy) या कापसावर अवलंबून असते. सध्या कापसाला मार्केटमध्ये ७ ते ८ हजार रुपये असा दर (Cotton Rate) मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मागील वर्षी कापसाला ११,००० ते १२,००० हजार असा दर मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन वाढवले होते. मात्र दर उतरल्याने शेतकऱ्यांनी अद्याप आपला कापूस मार्केटला विक्रीला नेलेला नाही. किमान १० हजार रुपये तरी दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कापसाची निर्यात वाढली तर कापसाचे दर वाढून शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल असं तज्ज्ञांचं मत आहे.
रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?
तुमच्या शेतात कोणतंही पीक असूदेत त्याचा बाजारभाव काय सुरूय याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आता रोजचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल अँपच्या मदतीने तुम्ही स्वतः महाराष्ट्रातील कोणताही बाजारसमितीमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव एका क्लिकवर चेक करू शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा.
१) Hello Krushi हे अँप गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करा.
२) तुमचा मो. नं. टाकून अँपवर फ्री रजिस्ट्रेशन करा.
३) आता अँप ओपन करून होम स्क्रीनवर बाजारभाव या विंडो मध्ये जा.
४) इथे तुम्हाला ज्या बाजारसमितीचा किंवा ज्या शेतमालाचा बाजारभाव पाहायचा आहे ते निवड.
५) तुम्हाला त्या वेळेचा सर्वात जलद अपडेट होणार बाजारभाव दाखवला जाईल.
शेतकऱ्यांनी कापूस ठेवलाय साठवून
सध्या कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढतील या आशेने कापूस आपल्या घरीच साठवून ठेवलेला आहे. कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही. जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्ये देखील कपाशीची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे.
Cotton Rate वाढण्यासाठी काय करावं लागेल?
सध्या कापड उद्योगांना कापूस कमी किमतीत हवा असल्याचं दिसत आहे. जिनींग आणि प्रेसिंग युनिटमध्ये कापसाची कमी आवक झालेली असूनदेखील अद्याप कापसाचे दर जैसे थे आहेत. शेतकऱ्यांनी आपला कापूस घरी साठवून ठेवला असून कापसाचे दर वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर काही पावले उचलणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे कापसाची निर्यात अधिक होण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. Cotton Export वाढले कि कापसाचे दर अधून १० जाहिरावर जाऊ शकतात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
हायटेक शेतीसाठी हे मोफत तंत्रज्ञान वापरून उत्पादनात वाढ करा
शेतकरी मित्रांनो आता आपण वेळेनुसार बदलण्याची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून शेतीत नवे बदल करून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. आता Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने शेतकऱ्यांना मोफत हायटेक शेतीचे तंत्रज्ञान वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सातबारा काढण्यापासून जवळच्या खत दुकानदाराला फोन करणे असो किवा रोजचा बाजारभाव जाणून घेण्यासोबत जनावरे, जमीन यांची खरेदी विक्री असो आता सगळं काही एकाच मोबाईल अँपवर उपलब्ध झाले आहे. आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi सर्च करा अन अप इन्स्टॉल करून १ लाख शेतकऱ्यांना जोडले जा.