Cotton Rate Today : आजचा कापूस बाजारभाव चेक करा; कोणत्या जिल्ह्यात किती दर मिळाला पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे दर (Cotton Rate Today) केव्हा वाढणार याची वाट पाहत आहेत. मागील वर्षी कापसाला ११ ते १२ हजार दर मिळाला होता. मात्र यंदा कापसाला सरासरी ७ ते ८ हजार रुपये इतका दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आज आपण राज्यातील सर्व बाजारसमित्यांमध्ये कापसाला किती भाव मिळाला याचा आढावा घेणार आहोत.

असा चेक करा स्वतः च्या मोबाईलवर रोजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील अँपच्या मदतीने शेतकरी आता स्वतः आपल्या मोबाईलवर रोजचा बाजारभाव चेक करू शकतात. यासोबत आपल्या जमिनीचा सातबारा, भूनकाशा, डिजिटल सातबारा आदी कागदपत्रेही Hello Krushi अँप वरून डाउनलोड करता येतात. तसेच आपल्या जमिनीची उपग्रहाच्या मदतीने मोजणी करता येते, सर्व सरकारी योजनांना अर्ज करता येतो, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री करता येते. आजच Hello Krushi अँप मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

राज्यात आज दिवसभरता कापसाला सेलू शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक ८४५० रुपये असा भाव मिळाला. सेलू येथे आज लांब स्टेपल कापसाची ५५० क्विंटल आवक नोंद झाली. तर वरोरा-मढोली शेती उत्पन्न बाजारसमितीत दिवसभरात कापसाची २५८ क्विंटल आवक झाली. यावेळी कापसाला कमीत कमी ८१०० रुपये तर जास्तीत जास्त ८२५० रुपये भाव मिळाला. Cotton Rate Today

दरम्यान, राज्यातील शेतकरी आपला कापूस घरामध्येच साठवून ठेवत असल्याचे चित्र आहे. येत्या दिवसांत कापसाचे दर वाढतील अशा आशेने शेतकऱ्यांनी कापूस अद्याप विक्री केलेला नाही. यामुळे कापड उद्योगांनाही कापसाची कमतरता भासत असून कापसाचे दर स्थिर राहतात कि उसळी घेतात हा येणार काळच सांगेल.

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2023
सावनेरक्विंटल4200815083508250
मनवतक्विंटल1800780085708440
किनवटक्विंटल80800081008050
राळेगावक्विंटल3500810083358230
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल1250810083508250
वरोरालोकलक्विंटल450800083008200
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल370760083008000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल258810082508175
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल550840084908450
error: Content is protected !!