Cotton Seeds : बनावट बीटी कापूस बियाण्यांपासून सावध राहा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन!

Cotton Seeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बियाणे (Cotton Seeds) खरेदीसाठी आणि मशागतीसाठी तयारी सुरु झाली आहे. अनेक शेतकरी सध्या चांगल्या कापूस बियाण्यांच्या शोधात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, असे तरी शेतकऱ्यांची फसवणूक शक्यता अधिक आहे. कारण ऐन हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांच्या सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना निष्काळजी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस बियाणे (Cotton Seeds) खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात छापा (Cotton Seeds For Farmers)

दरम्यान, राज्यात दरवर्षी शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे येते. विशेष म्हणजे मध्यवर्ती भाग असल्याने प्रशासनाला त्यावर नियंत्रण मिळवणे देखील अवघड जाते. मागील महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यातच अहेरी येथे राज्य सरकारच्या कृषी विभागाने छापा टाकून १८ लाख रुपयांचे बनावट कापूस बियाणे पकडले होते. परिणामी, येत्या खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना बॅच क्रमांक पाहून, पक्के बिल न घेतल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी दरम्यान ही काळजी घ्यावी, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

विनाविलंब तक्रार करण्याचे आवाहन

यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी करताना बियाण्याची गुणवत्ता व कंपनीबाबतची विश्वासार्हता या बाबी तपासणे गरजेचे आहे. दरम्यान, कोणी बनावट बियाणे विक्री करत असेल तर तत्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी. संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना गुणवत्तेबाबत तडजोड करु नये व फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.