Cotton Seeds : अव्वाच्या सव्वा दराने कापूस बियाण्याची विक्री; कृषी केंद्राला कारवाईचा दणका!

0
3
Cotton Seeds In Akola
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील अनेक भागांमध्ये अव्वाच्या सव्वा दराने कापूस बियाणांची विक्री (Cotton Seeds) केली जात आहे. तर काही भागांमध्ये बी-बियाणांचा काळाबाजार सुरु आहे. दोनच दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये प्रतिबंधित बियाणे विक्री प्रकरणी कृषी विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून अव्वाच्या सव्वा दराने बियाणांची विक्री करणाऱ्या एका कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऐन खरिपाच्या तोंडावर बी-बियाण्याच्या (Cotton Seeds) काळ्या बाजाराला चांगलाच ऊत आलेला पाहायला मिळत आहे.

सापळा रचून कृषी केंद्रावर कारवाई (Cotton Seeds In Akola)

सध्याच्या घडीला बाजारात शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे (Cotton Seeds) मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. तर दुसऱ्या बाजूला कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांना नाडले जात असून, कापसाचे प्रति बियाणे पॅकेट 1400 रुपयांना विक्री केले जात आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथे हा प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाने सापळा रचून येथील कृषी केंद्रावर कारवाई केली असून, या प्रकरणी कृषी विभागाकडून तेल्हारा पोलीस स्टेशनला संबंधित कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून यापूर्वीच झाला होता आरोप

दरम्यान, शेतकरी कापूस मिळत नसल्यामुळे चांगलेच आक्रमक झाले होते. परिणामी, वैतागून शेतकऱ्यांनी अकोल्यात रास्ता रोका आंदोलन देखील केले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अकोला जिल्ह्यात सध्या बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून, काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून झाला होता.

“शेतकऱ्यांना सकाळपासूनच रांगेत थांबावे लागत आहे. कूपन मिळाल्यानंतर दुपारी भर उन्हात रांगेत उभे रहावे लागते. मात्र, त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नाही, केवळ दोन किंवा तीन बियाण्याचे पॅकेट(Cotton Seeds) हातात मिळतात.” असा आरोपही शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर स्थानिक कृषी विभागाने आज आक्रमक पवित्रा घेत अडसूळ येथील कृषी केंद्रावर ही कारवाई केली आहे.