हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन (Cotton Soybean Farmers Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपाचा निर्णय शिंदे सरकारकडून (Maharashtra Government) काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला. त्यानुसार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य (Cotton Soybean Farmers Subsidy) मंजूर करण्यात आले आहे. परंतु हे अनुदान वाटपामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु आता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य (Cotton Soybean Farmers Subsidy) वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री (Agriculture Minister) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले आहेत.
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य (Kapus Soybean Farmers Anudan) मंजूर करण्यात आले आहे (Cotton Soybean Farmers Subsidy) .
यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 (Kharif Season 2023) च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे.
सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य (Cotton Soybean Farmers Subsidy) वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषिमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. मुंडे यांनी सांगितले की, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Soybean Farmers Subsidy) मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे.
श्री.धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान (Cotton Soybean Farmers Subsidy) देण्याची घोषणा केली होती; त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे (Cotton Soybean Farmers Subsidy) .