हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम 2023 मधील (Cotton Soybean Subsidy) कापूस आणि सोयाबीन उत्पादक (Cotton Soybean Farmers) 65 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 500 कोटी अर्थसहाय्य वितरीत होणार असल्याची घोषणा कृषिमंत्री (Agriculture Minister) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली होती. त्यामुळे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 500 कोटी अर्थसहाय्य (Cotton Soybean Subsidy) वितरीत होणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आजच सोमवार, 30 सप्टेंबर रोजी 10 हजार जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र कृषि विभाग कडून सन 2010, 2021 आणि 2022 या वर्षात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ काल महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर, कृषि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे.
राज्यातील जवळपास 96 लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान (Cotton Soybean Subsidy) मंजूर झाले आहे. यात प्रति हेक्टरी 5000 आणि 2 हेक्टर मर्यादेत असे जास्तीत जास्त 10,000 अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी उद्या 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी चे वितरण होणार आहे. यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, शेतकर्यांच्या आनंदात माझा आनंद आहे. या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी (Cotton Soybean Subsidy) अनेक योजना (Government Scheme) सरकारने आणल्या. महाराष्ट्र सगळ्यात चांगले कृषि राज्य हे शेतकर्यांमुळेच असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.