हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला (Cotton Variety) सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे 2024 च्या खरीप हंगामात देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. अशातच सर्वच हवामान संस्थांकडून देखील यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळाले आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी खात्रीशीर कापूस बियाण्यांच्या चाचपणीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या हंगामात विक्रमी कापूस उत्पादन मिळवण्यासाठी योग्य आणि खात्रीशीर बियाण्याच्या शोधात असाल तर पुढील ९ प्रजातींचे कापूस बियाणे (Cotton Variety) तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.
‘या’ आहेत कापसाच्या 9 सर्वोत्कृष्ट जाती (Cotton Variety For Farmers)
राशी सीड्स कंपनीचे राशी 779 कापूस वाण : गेल्या वर्षी या जातीच्या कापसाची (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. काही शेतकऱ्यांनी या जातीपासून एकरी 22 ते 25 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळवले आहे.
साई भव्य कंपनीचे सुपर टारगेट कापूस वाण : गेल्या वर्षी या जातीची देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. या जातीपासून एव्हरेज 15 ते 16 क्विंटलचे उत्पादन मिळाले आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी वीस क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळवल्याचे समोर आले आहे.
युएस ॲग्री सीड्स कंपनीचे युएस 704 कापूस वाण : या जातीचे वाण देखील शेतकऱ्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या जातीच्या कापसाला टपोरे बोंड लागतात आणि चांगले उत्पादन मिळते.
युएस ॲग्री सीड्स कंपनीचे युएस 70 67 कापूस वाण : या जातीचे कापूस बियाणे देखील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असून, हे वाण लवकर काढण्यासाठी तयार होणारे आहे. या जातीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत कापूस मिळतो. यामुळे जर तुम्हाला लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या कापसाची लागवड करायची असेल तर या जातीचे बियाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
याशिवाय राशी सीड्स कंपनीचे राशी 659, तुळशी सीड्स कंपनीचे कबड्डी, तुळशी सीड्स कंपनीचे पंगा, प्रभात सीड्स कंपनीचे सुपरकोट, श्रीकर सीड्स कंपनीचे जय हो या कापूस जातींची देखील गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली होती.