हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे (Cotton Variety) आगमन होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये 28 मे ते 3 जून या कालावधीत दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या राज्यात यंदा वेळेवरच मान्सून आगमन होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आठ जूनच्या सुमारास आगमन होणार असा अंदाज आहे. मान्सून आगमन झाल्यानंतर राज्यात खरीप हंगामातील पीक पेरणीला वेग येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कपाशीच्या टॉप 5 जातींची (Cotton Variety) माहिती जाणून घेणार आहोत.
‘हे’ आहेत कपाशीचे टॉप 5 वाण (Cotton Variety For Farmers)
अजित सीड्स कंपनीचे अजित 5 बीजी II : जर तुम्ही कोरडवाहू जमिनीत कपाशी लागवड (Cotton Variety) करणार असाल तर अजित सीड्स कंपनीचे हे वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.
धरती सीड्स कंपनीचे अंकुर नारायण बीजी II म्हणजे मिरीट : जाणकारांच्या माहितीनुसार धरती सीड्स कंपनीची ही जात कोरडवाहू जमिनीत लागवडीसाठी उत्तम असल्याचे आढळून आले आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे शेतकरी याची तीन बाय दोन, तीन बाय एक, साडेतीन बाय एक या अंतरावर लागवड करू शकतात.
प्रभात सीड्स कंपनीची सुपर कॉट : महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सुपरकॉट या जातीची लागवड करतात. अधिक उत्पादनासाठी ओळखली जाणारी ही जात कोरडवाहू जमिनीत लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
नूजीविडू सीड्स कंपनीची नवनीत : कोरडवाहू जमिनीत लागवडीसाठी कापसाचे आणखी एक सुधारित जात म्हणजेच नवनीत. या जातीची राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही भागांमध्ये लागवड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही कोरडवाहू जमिनीत यंदा कपाशी लावण्याचा प्लॅन बनवत असाल तर या जातीची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
एनबीसी-10 : एन बी सी 10 या जातीची देखील कोरडवाहू जमिनीत लागवड केली जाऊ शकते. राज्यातील हवामान या जातीच्या पिकासाठी अनुकूल असल्याचे आढळले आहे. यामुळे जर तुम्हालाही यंदा कपाशी लागवड करायची असेल तर या वाणाची तुम्ही निवड करू शकतात.