गायीने खाटक्याला शिकवला चांगलाच धडा ; बांधलेल्या दोरीनेच नेले फरफटत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरंतर गायीला मातेचे स्थान आपण देतो. मात्र गायीला जबरदस्तीने ओढून नेणाऱ्या खटक्याला गायीने चांगलीच अद्दल घडवली आहे. या संदर्भातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे समजू शकले नाही मात्र हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचे बोलले जात आहे. ही घटना पाकिस्तानातील असल्याचा दावा युझर्सनी केला आहे. कराचीच्या गुलिस्‍तान-ए-जौहर परिसरातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे.

गायीने शिकवला धडा

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, गायीला दोरीने बांधून तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चार लोक त्या गाईला नियंत्रित करत आहेत.सुरुवातीला गाय त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करते. पण ते लोक तिला घाबरवताना दिसतात. अखेर विरोध करते आणि संधी मिळताच तिथून पळ काढते. यावेळी तिला नियंत्रित करणाऱ्या एक व्यक्ती गाईला बांधलेल्या दोरीतच अडकला आहे. गाय त्याला तसंच खेचत घेऊन जाताना दिसते.

काही लोक त्याला वाचवण्यासाठी आणि गाईला पकडण्यासाठी त्यांच्या मागे पळताना दिसतात. पण गाय काही थांबत नाही. बऱ्याच दूरपर्यंत ती जाते. काही अंतरावर तो खाटिक बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसतो. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ नसीमा सरदार नावाच्या एका महिलेच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!