Cow Dung Paint : आता सरकारी इमारती, शाळा शेणाने रंगवल्या जाणार; शेतकऱ्यांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन | भारतीय संस्कृतीत गाईला (Cow) अनन्य साधारण महत्व आहे. गाईपासून दूध मिळते तसेच तिच्या शेणापासून शेतीसाठी खत मिळते. गाईच्या गोमुत्राचा वापरही अनेक ठिकाणी केला जातो. यासर्व बाबीमुळेच गाईला गोमाता असं म्हटलं जात. आता गाईच्या शेणापासून बनवलेल्या सेंद्रिय रंगाने (Cow Dung Paint) सरकारी इमारती, शाळा रंगवल्या जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या शेजारील छत्तीसगड मधील रायपूर येथे सध्या असा उपक्रम राबवला जात आहे. रायपूरमधील सरकारी इमारती आणि शाळांमधील (School) भिंती रंगविण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेले सेंद्रिय पेंट वापरले जात आहे. ‘गोधन न्याय योजने’अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी येत आहे. हा पेंट सरकारी इमारती आणि शाळांमध्ये वापरला जात आहे अशी माहिती जिल्हाधिकारी रायपूर यांनी दिली आहे.

दरम्यान, हा उपक्रम आगामी काळात देशभर राबवला जाण्याची शक्यता आहे. केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार गोपालनासंबंधी अनेक सरकारी योजनाही (Government Scheme) सुरु करत आहे. शेणापासून बनवलेल्या रंगाने इमारती रंगल्यास याचा थेट शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला हातभार लागू शकतो असे बोलले जात आहे.

सुरु करा स्वतःचा व्यवसाय (Business Idea)

शेतकरी मित्रांनो यानिमित्ताने आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो कि तुम्ही सेंद्रिय कलर निर्मितीच्या व्यवसायात पदार्पण करायला हवे. आपल्या देशातील खेडोपाडी फार पूर्वीपासून शेणाने भिंती मिरवण्याची पद्धत प्रचलित आहे. मात्र येत्या काही दिवसांत मातीच्या भिंतींची जागा सिमेंटने घेतली अन हळू हळू शेणाने भिंती व घर सरवण्याचे प्रमाण कमी झाले. आता नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेणापासून Organic Paint बनवून त्यावर योग्य प्रक्रिया केल्यास तो अधिक काळ टिकून राहत असल्याने त्याचा वापर होत आहे. जर तुमच्याकडे गाई, म्हशी असतील तर खतासोबतच तुम्ही या व्यवसायाचीही सुरवात करायला हरकत नाही.

तुमच्या व्यवसायाला असे मिळवा Online ग्राहक (Marketing Strategy)

शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणताही शेतीशी निगडित व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाला Online ग्राहक मिळवून देण्यासाठी आम्ही तुमची मदत करत आहोत. Amazon, Flipcart यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता तुम्हीसुद्धा Mobile App च्या माध्यमातून तुमच्या व्यवसाय वाढवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलरून गुगल प्ले स्टोअरमधील Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर अँप ओपन करून शेतकरी दुकान या सेगमेंट मध्ये तुमचा व्यवसाय मोफत रजिस्टर करायचा आहे. यामध्ये रोपवाटिका, खत दुकान, इरिगेशन, शेती निगडित सेवा, दुग्धव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन केंद्र, फार्म हाऊस अशा अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्ही नोंदवू शकता.

error: Content is protected !!