हॅलो कृषी ऑनलाईन: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या (Crop Insurance) खात्यात गेल्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) पीक विमा भरपाईचे 370 कोटी 85 लाख रुपये जमा झाले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळ नुकसान (Natural Calamity) झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 203 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण 370 कोटी 85 लाख रुपयांची पीक विमा (Crop Insurance) रक्कम जमा झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकर्यांच्या (Farmers) तक्रारींची दखल घेत विमा कंपन्यांवर तातडीने रक्कम वितरण करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.
या तालुक्यातील शेतकर्यांना सर्वाधिक लाभ
जिल्ह्यातील सोयगाव आणि वैजापूर तालक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा (Crop Insurance Amount) सर्वाधिक लाभ मिळाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये 98% पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विमा लाभ (Crop Insurance) मिळाला आहे. तर फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात कमी लाभ मिळाला आहे.
छ. संभाजीनगर तालुक्यातील 34,167 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 26,578 शेतकर्यांना 24.53 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
गंगापूर तालुक्यातील 60,783 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 53,878 शेतकर्यांना 57.86 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
कन्नड तालुक्यातील 67,196 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 58,204 शेतकर्यांना 51.71 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
खुलताबाद तालुक्यातील 20,441 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 13,877 शेतकर्यांना 10.10 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
पैठण तालुक्यातील 54,606 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 35,743 शेतकर्यांना 26.44 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
फुलंब्री तालुक्यातील 36,367 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 19,263 शेतकर्यांना 14.88 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
सिल्लोड तालुक्यातील 61,671 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 55,305 शेतकर्यांना 48.73 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
सोयगाव तालुक्यातील 20,857 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 20,787 शेतकर्यांना 31.14 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
वैजापूर तालुक्यातील 82,115 शेतकर्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी 81,164 शेतकर्यांना 105.45 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
एकूण 4,38,203 शेतकऱ्यांपैकी 3,64,799 शेतकर्यांना 370.85 कोटी रू. विमा मिळालेला आहे.
विमा रकमेच्या (Crop Insurance) स्वरुपात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळाले आहे.
शेतकरी संघटनांनी (Farmers Union) जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांचे स्वागत केले असून त्यांनी शेतकऱ्यांना विमा लाभ मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.