Crop Insurance Compensation: नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक विम्यापोटी मिळणार 853 कोटी रुपये; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नाशिक जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी (Crop Insurance Compensation) 853 कोटी रुपये मिळणार अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना (Farmers) या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Nashik Farmers) ही समाधानकारक बातमी असून जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना देय (Crop Insurance Compensation) असलेले 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे. पिकविमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले.

जनसन्मान यात्रेदरम्यान लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा

काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनंतर प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये (Crop Insurance Compensation) इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित होते. याबाबतची माहिती मिळताच मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला. तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीनेही मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे .

शेतकऱ्यांना फायदा

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी विमा पिक विमा (Crop Insurance Compensation) योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीपोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते. त्याच्या वाटपाची कारवाई सुरु आहे. त्यानंतर आज कृषिमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये (Crop Insurance Compensation) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.