Crop Insurance: पीक विमा योजनेत झालेले ‘हे’ नवीन बदल तुम्हाला माहित आहेत का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शासनाने पीक विमा (Crop Insurance) योजनेत भरपाई देण्याच्या निकषात बदल केले आहेत. बदललेल्या निकषानुसार शेतकर्‍यांना जादा भरपाई मिळेल असा दावा सरकारने केला. पण प्रत्यक्षात पीक विमा वेगवेगळे ट्रिगर्स लागू होण्याच्या निकषात (Crop Insurance Criteria) बदल केले नाहीत. शेतकर्‍यांची मूळ मागणी (Basic Demand of Farmers) ट्रिगर्स लागू होण्याचे निकष बदलण्याची होती. सरकारने कोणते निकष बदलले याची सविस्तर माहिती घेऊ या (Crop Insurance).

खराब हवामानामुळे पेरणी न करता येणे (Crop Insurance)

ज्या ठिकाणी विमा संरक्षित क्षेत्र (Insurance Covered Area) आहे तिथे अपुरा पाऊस किंवा इतर हवामान विषयक प्रतिकूल घटकांमुळे 75 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र नापेर राहिले तर हा ट्रिगर लागू पडतो. या परिस्थितीत जुन्या पद्धतीत शेतकर्‍यांना एकूण संरक्षित रकमेच्या 25 टक्के भरपाई मिळत होती. ही भरपाई मिळाल्यानंतर शेतकर्‍यांना विमा दावा संपत होता. कारण पेराच झाला नसल्याने शेतात पीकच राहत नाही. बदललेल्या पद्धतीत म्हणजेच नव्या भरपाईच्या पद्धतीतही हाच नियम कायम ठेवण्यात आला.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अग्रिम भरपाई देणे

विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पावसात सलग 21 दिवसांपेक्षा जास्त खंड पडला आणि उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट येऊ शकते असे निदर्शनास आल्यास 25 टक्के अग्रिम भरपाईची तरतूद आहे. जिल्हाधिकारी अग्रिम भरपाईसाठी अधिसूचना काढू शकतात. नव्या निकषात ट्रिगर लागू करण्याच्या अटी कायम ठेवल्या पण विमा भरपाई (Insurance Compensation) काढण्याची पद्धत बदलली आहे.

पीक विमा अग्रिम मिळण्याचा नवा निकष (Advance Crop Insurance)

अग्रिम भरपाईच्या नव्या निकषानुसारही 21 दिवसांचा खंड तसेच इतर निकष आणि उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घटीचा अंदाज हे निकष कायम ठेवले. समजा एखाद्या मंडळात 60 टक्के नुकसानीचा अंदाज आहे आणि संरक्षित रक्कम 50 हजार आहे. तर आता विमा संरक्षित रकमेच्या 60 टक्के म्हणजेच 50 हजाराच्या 60 टक्के येते 30 हजार, या 30 हजाराच्या 25 टक्के म्हणजेच 7 हजार 500 रुपये अग्रिम भरपाई दिली जाईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई (Natural Calamities Compensation)

शेतकर्‍याचे पीक विमा (Crop Insurance) संरक्षित क्षेत्र पाण्यामुळे जलमय झाले, भूस्खलनामुळे नुकसान झाले, ढगफुटी झाली किंवा वीज कोसळून आग लागून नुकसान झाले तर नुकसानीचे वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्‍चित केली जाते. या ट्रिगरमध्ये पीक वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादन खर्चाचा विचार केला जातो. जुन्या पद्धतीत आलेल्या नुकसान भरपाईतून अग्रिमची रक्कम वगळली जात होती.

पण नव्या पद्धतीत शेतकर्‍याला आधी अग्रमी भरपाई मिळाली असेल ती एकूण विमा संरक्षित रकमेतून वगळली जाईल. म्हणजेच विमा संरक्षित रक्कम 50 हजारामधून अग्रिमची 7500 रुपये वगळून 42 हजार 500 रुपये विमा संरक्षित रक्कम राहते. आता नुकसान 50 टक्के असल्याने 42 हजार 500 रूपयांच्या 50 टक्के म्हणजेच 21 हजार 250 रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती भरपाई दिली जाईल.

पीक काढणीपश्‍चात नुकसान भरपाई (Post-Harvest Compensation)

जुन्या निकषाप्रमाणे काढणीपश्‍चात पिकांचे समजा 50 टक्के नुकसान झाले. तर त्या शेतकर्‍याला 25 हजार रुपये भरपाई मिळेल. पण जर त्या शेतकर्‍याला आधी 25 टक्के अग्रिम भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम त्यातून वगळली जायची. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतूनही नुकसान भरपाई मिळाली तर तीही वजा केली जायची.

नव्या निकषानुसार अग्रिम आणि स्थानिक आपत्तीतून मिळणारी रक्कम ही काढणीपश्‍चात नुकसान भरपाईच्या रकमेतून वजा केली जाणार नाही. तर एकूण विमा संरक्षित रकमेतून वजा केली जाईल. म्हणजेच विमा संरक्षित रक्कम 50 हजार आहे आणि शेतकर्‍याला अग्रिम 7500 रुपये मिळाला असेल, तर ही रक्कम विमा संरक्षित रकमेतून वजा केली जाईल. तसेच अग्रिम आणि स्थानिक आपत्तीचे नव्या निकषानुसार 21 हजार 250 रुपये मिळाले, तर या दोन्ही रकमा काढणीपश्‍चात नुकसान भरपाईतून नाही तर विमा संरक्षित रकमेतून म्हणजेच 50 हजारामधून वजा केल्या जातील.

पीक कापणी प्रयोगाधारित भरपाई (Crop Harvest Experimental Compensation)

जुन्या निकषात पीक कापणी प्रयोगातून आलेल्या नुकसान भरपाईतून जर अग्रिम, स्थानिक आपत्ती आणि काढणीपश्‍चात भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम वगळली जायची. ही रक्कम जर पीक कापणी प्रयोगातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल किंवा तेवढीच असेल शेतकर्‍याला काहीच मिळत नाही. पण शेतकर्‍याला जर यापैकी कोणतीही भरपाई मिळाली नसेल तर पीक कापणी प्रयोगानुसार आलेली भरपाई दिली जायची. नव्या निकषानुसारही पीक कापणी प्रयोगातून आलेल्या पातळीनुसार भरपाई मिळेल. शेतकर्‍याला जर अग्रिम, मध्य हंगाम किंवा काढणी पश्चात् नुकसान भरपाई मिळाली नसेल तर संरक्षित रकमेतून नुकसानीच्या पातळीनुसार भरपाई मिळेल. तर यापैकी एक किंवा दोन टप्प्यांत भरपाई मिळाली असेल तर ती भरपाईची रक्कम विमा संरक्षित रकमेतून वगळली जाईल आणि उरलेल्या रकमेतून नुकसानीच्या पातळीनुसार शेतकर्‍याला भरपाई (Crop Insurance) मिळेल.

error: Content is protected !!