Crop Loan: पीक कर्ज वाटप येत्या दोन महिन्यात पूर्ण करा; खरीप हंगाम आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांचे आदेश

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) वाटप लक्षांक जून महिन्याअखेर 70 टक्के आणि उर्वरित जूलै महिन्या अखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) विजयलक्ष्मी बिदरी (Vijayalakshmi Bidari) यांनी खरीप आढावा बैठकीत (Kharif Season Review Meeting) जिल्ह्यांना दिले.

ई-केवायसी (ekyc) व अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या पीक

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) वाटप लक्षांक जून महिन्याअखेर 70 टक्के आणि उर्वरित जूलै महिन्या अखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) विजयलक्ष्मी बिदरी (Vijayalakshmi Bidari) यांनी खरीप आढावा बैठकीत (Kharif Season Review Meeting) जिल्ह्यांना दिले.

नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करा, दुष्काळ सदृष्य भागात शासनाने ठरवून दिलेल्या सवलती शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. विभागात अनधिकृत कापूस बियाणे विक्री संदर्भात 9 गुन्हे दाखल करून 165.53 लाखांचा 79.34 क्विंटल साठा जप्त करण्यात आल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

चालू खरीप हंगामात (Kharif Season) आतापर्यंत 5 हजार 247 कोटी 7 लाख 58 हजार रूपयांच्या खरीप पीक कर्ज (Crop Loan) वाटपापैकी 2 लाख 14 हजार 897 शेतकऱ्यांना (Farmers) 1 हजार 819 कोटी 52 लाख 11 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लक्षांकापैकी जून महिन्याअखेर 70 टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पीक कर्ज वाटप पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी विभागातील 85 हजार 644 शेतकऱ्यांना द्यावयाचा निधी ई-केवायसी, बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे प्रलंबित आहे. महसूल व कृषी विभागाने शेतकर्‍यांचे ई-केवायसी,बँक खाते आधार लिंक करून घेत पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नागपूर विभागात (Nagpur Division) खरीप हंगामातील अनधिकृत बियाणे, खते व किटकनाशकांबाबत कठोर कार्यवाही करण्यात आली. बियाणे खरेदी करताना घ्यावयाच्या काळजी व तक्रारीबाबत नागपूर विभागातील सर्व कृषी केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक 18002334000 व मोबाईल तथा व्हाट्स ॲप क्रमांक 9373821174 माहिती फलकाद्वारे प्रसिध्द करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.