महत्वाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीककर्ज, तारीखही ठरली…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. बरेच कुटुंब शेतीवरच आपला उदरनिर्वाह करत असतात. शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस, पूर तसेच शेतीमालाला नसणारा हमीभाव त्यामुळे संकट येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत असतो. काही शेतकरी नियमित कर्ज भरतात तर काही उशिरा कर्ज भरतात.

पीक कर्जाला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

आत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नियमित पीककर्ज भरत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीतील उरलेली रक्कम १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली आहे. (Peak loan)

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी होत नव्हती, त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे नियमित कर्जमाफी करणाऱ्या निम्म्या शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही. याच मुद्द्यावरून विधानपरिषदेत विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले. त्यांनी लवकरात लवकर हे प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

पोकरा योजनेचा दुसरा टप्पा सुरु

तसेच शेतीसाठी फायदेशीर असणारी पोकरा योजना (Poker plan) आता प्रत्येक गावात केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती देखील मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project) याच्या अंतर्गत पोकरा ही योजना येते. राज्यातील लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेतून मदत केली जात असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

error: Content is protected !!