हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी हंगाम सुरु झालेला आहे (Crop Management Advisory) काही ठिकाणी पिकांची लागवड, आंतर मशागतीची कामे तर काही ठिकाणी पीक संरक्षण उपाय सुरु आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या (VNMKV Parbhani) तज्ज्ञांनी (Agriculture Expert) विविध पिकांसाठी खास व्यवस्थापन सल्ला दिलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर.
पीक व्यवस्थापन सल्ला (Crop Management Advisory)
- ऊस पिकावर खोड किडीचा (Sugarcane Stem Borer) प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- ऊस पिकावर बरेच ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Crop Management Advisory).
- हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत.
- हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Crop Management Advisory).
- जोमदार वाढीसाठी हरभरा पीक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी.
- खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती करडई पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45 X 20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व 30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे.
- संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड (15 पीपीएम) 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- संत्रा/मोसंबी बागेत आंतर मशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
- डाळिंब बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड (15 पीपीएम) 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
- चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
- रब्बी हंगामात भाजीपाला पिकाचे गादी वाफे व लागवड केलेला भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
- काकडीवर्गीय पिकात केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Crop Management Advisory).