Crop Management : थंडीत रब्बी पिकांचं व्यवस्थापन कसं करावं? शेतकरी मित्रांनो ‘अशी’ घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । थंडीचा (Winter Season) रब्बी पिकांवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होणार आहे. (Crop Management) त्याअनुषंगाने विचार केल्यास करडई पीक (kardai) सध्या फ्लोरा अवस्थेमध्ये आहे. या पिकावर येणाऱ्या थंडीचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचबरोबर यावर पडणाऱ्या किडीवर (Insecticides) शेतकऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. थंडीमुळे करडईवर मावा रोगाचा (Virus) प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय-योजना करणे आवश्यक आहे.

तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

सोलापुर जिल्ह्यात (Solapur) ज्वारीखालील क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. सध्या ज्वारीचे पीक फ्लोरा अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. किमान तापमानात होणारी घट या पिकासाठी उपयुक्त आहे. पिकाच्या पुढील वाढीसाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार आहे. पण तापमान किमान अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास या पिकासाठी अनिष्ट परिणाम करणारे ठरणार आहे. दाणे भरण्यासाठी अडचण ठरणार आहे. Crop Management

गहू पीक सध्या मुकुट मुळी फुटण्याच्या अवस्थेत ते काडी धरण्याच्या अवस्थेत आहे. या पिकासाठी हे वातावरण फायदेशीर (Profit) ठरणार आहे. या पिकावर मावा, कुडकूडे वाढण्याची शक्यता आहे. हरभरा पीक सध्या फ्लोरा अवस्था ते घाटे धरण्याच्या स्थितीत आहे. ही थंडी या पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. मागील 10 ते 15 दिवसाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण होते. या हिवाळी ऋतूमध्ये अचानक ढगाळ तर कधी थंडी जाणवत आहे. हा हवामान बदलाचा परिणाम रब्बी पिकांवर जाणवत आहे.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे.
9404075628

error: Content is protected !!