हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

आता ड्रोनच्या माध्यमातून होणार पिकांवरील कीडीचे नियंत्रण! शेतकऱ्यांसाठी ‘इथे’ प्रक्षिक्षण

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रोनचा वापर, पार्सल देण्यासाठी, गुप्तहेर, तसेच इतर कारणांसाठी केला जातो. तसेच शेतीसाठी देखील फवारणी करण्यासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती नाही. तसेच ड्रोनचा वापर करून पिकांवरील कीडीचे नियंत्रण कसे करायचे याची शेतकऱ्यांना कल्पना नाही.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यापासून ड्रोन हातळण्याचे प्रशिक्षण हे दिले जाणार आहे. त्या अनुशंगाने आमदार राणाजगजितसिंह यांची ड्रोन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली असून जानेवारीपासून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सेंटर ऑफ एक्सलंन्स ची होणार स्थापना

–कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देण्याच्या अनुशंगाने उस्मानाबाद येथे एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे.
–शेती व्यवसयात ड्रोनचे तंत्रज्ञान किती महत्वाचे आहे हे देखील शेतकऱ्यांना सांगितले जाणार आहे.
–केंद्र सरकारनेही ड्रोनच्या वापराला परवानगी दिली असून त्याबाबत मार्गदर्शक सुचना केल्या आहेत.
–आता केंद्र सरकारचा उपक्रम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ठेपला आहे.

ड्रोनचा काय फायदा होणार?

–रब्बीच्या सुरवातीच्या अवस्थेतील किड ही डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाही.
–मात्र, हाय डेफिनेशन कॅमेरामुळे या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येणार आहे. ड्रोनमुळे किडीवर आळा घालण्यासाठी योग्य औषधांची योग्य प्रमाणात फवारणी आणि ते ही वेळेवर करणे सहज शक्य होणार आहे.
–कमी वेळेत आणि कमी खर्चात औषध फवारणी होणार आहे.
–उंचावरुन फवारणीमुळे अत्यंत लहान तुषार पिंकावर सर्वत्र सम प्रमाणात फवारणी होणार आहे.

काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?

–ड्रोनच्या माध्यमातून किटनाशकांवर औषध फवारणी करण्याची मोठी क्षमता आहे.
–यामध्ये पिकांचे संगोपन आणि काही दुष्परिणाम होणार नाहीत त्याअनुशंगाने कृषी मंत्रालय हे काळजी घेत आहे.
–यामध्ये पिक फवारणी क्षेत्र, फ्लाय क्लिअरन्स, वजनाची मर्यादा, नोंदणी, सुरक्षा विमा तसेच हंगामी परस्थितीचा उल्लेख याचा समावेश नियमावली तयार करताना करण्यात आला आहे.
— एवढेच नाही तर ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवतानाही काय काळजी घ्यावयची याची नियमावली ठरवून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!