Thursday, March 23, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

अशा पद्धतीने करा रब्बी कांद्याची लागवड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
November 16, 2022
in पीक व्यवस्थापन
Rabbi Onion Management
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजच्या लेखात रब्बी हंगामात केल्या जाणाऱ्या कांदा लागवडीविषयी माहिती घेऊया…

रब्बी कांद्याची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत बियांची पेरणी करून ड़िसेंबर-जानेवारी महिन्यांत रोपांची पुनलांगवड़ केली जाते.

एन-२-४-१ : कांदे गोलाकार आणि मध्यम ते मोठे असतात. रंग चकाकी येते. ५-६ महिने चांगले टिकतात. लागवडीनंतर १२o दिवसांनी काढणीस येतात. हेक्टरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळते. अँग्रीफाऊंड़ लाइट रेड़, भीमा किरण, भीमा शक्ती, अरका निकेतन. बियाणे रब्बीच्या जातीचे बी फक्त एकाच रब्बी हंगामासाठी वापरता येते. कुठल्याही हंगामासाठी बियाणेखरेदी मे महिन्यातच करावी. कारण साधारण ८ ते १० केिली बियाणे लागते.

रोपवाटिका

एक हेक्टर कांदा लागवडीसाठी १०-१२ गुंठे क्षेत्र रोपवाटिका लागते. रब्बी हंगामासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणारी जागा रोपवाटिकेसाठी निवडाची.
रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करावेत. वाफ्यांची रुंदी १ मी. उंची १५ सेंमी. व लांबी ३ ते ४ मीटर असावी. प्रत्येक वाफ्यात दोन घमेली कुजलेले शेणखत, 100 ग्रॅम सुफला १५:१५:१५ आणि ५० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड घालून वाफा एकसारखा करून घ्यावा.
प्रत्येक चौरस मीटरवर १० ग्रॅम बियाणे पेराचे. १० सेंमी. अंतरावर २ सेंमी. खोल रुंदीस समांतर रेषा ओढून बी पातळ पेरावे. पेरलेले बी मातीने झाकाचे व वाफ्यांना बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे. पेरणीपूर्वी २-३ ग्रॅम कार्बन्डॅझिम प्रतिकेिली बिंथाण्यास चोळावे.
रोपे निरोगी राहण्यासाठी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम युरिया व ५ ग्रॅम फोरेट रोपांच्या दोन ओळींमधून द्यावे. बुरशीनाशकाच्या व कीटकनाशकाच्या १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारन्या कराव्यात.

लागवडीअगोदर पाणी कमी केल्यास रोपे काटक बनतात. रोपे उपटण्यापूर्वी २४ तास पाणी दिल्यास रोप उपटणे सोपे होऊन मुळांना कमी इजा होते. रब्बी हंगामासाठी ५०-५५ दिवसांनी रोपे लागवडयोग्य होतात.

रोपांची पुनर्लागण 

रब्बी हंगामात १०’ x १० सेंमी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कार्बन्डॅझिम व १० मिलि. प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल टाकून द्रावण करावे. रोपाचे शेंडे कापून या द्रावणात बुडवून लागवड करावी.

तण नियंत्रण

कांदा रोपलागवडीनंतर खुरपणीसाठी खूप खर्च येतो. खुरपणीमुळे मुळाशी हवा खेळती राहून कांदा चांगला पोसतो. रब्बी २५ दिवसांनी ऑक्झफ्लोरफेन ७.५ मिलेि. व क्युझेंलोफॉप इथाईल १o मिलिं. प्रतेि १० लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी. त्यानंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.

खत व्यवस्थापनकांदा पिकास हेक्टरी ४0 तें ५0 बैलगाड़या शेणखत व शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत हेक्टरी १oo किलो नत्र,

५० किलो स्फुरद व ५० किलो पालाशपैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीमध्ये मिसळून द्यावे. राहिलेले ५० किलो नत्र ३० व ४५ दिवसांनी एक खुरपणी करून द्यावे. साठ दिवसांनंतर कांदा पिकास कोणतेही वर खत देऊ नये.

पाणी व्यवस्थापन

जमीन कोरडी असताना लागवड केल्यास वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर पाणी तोडावे. रब्बी हंगामातील पिकांना शेवटी पाण्याची कमतरता भासते. त्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कांदाकाढणीपूर्वी तीन आठवडे पाणी तोडावे व ५० टक्के झाडांच्या माना पडल्यावर कांदा काढणीस सुरुवात करावी. रोग व किडींचे व्यवस्थापन : कांदा पिकावर रब्बी हंगामात प्रामुख्याने तपकिरी करण्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानावर बाहेरील भागावर दिसू लागतात. चठ्ठयांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.

१५ ते २0 0 सें. तापमान व ८o९० टक्के आद्रतेमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते. फेब्रुवारी- मार्च महिन्यांत पाऊस किंवा ढगाळ वातावरण या रोगास फारच पोषक ठरते. तसेच, याच कालावधीत जांभळा करपा रोगाचाही प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे चठ्ठयांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट होऊन नंतर काळपट पाने करपतात. फुलकिडे ही कांदा पिकाचे नुकसान करणारी मुख्य कोड आहे. या किडीची पिले व प्रौढ कीटक पानातील ठिपके पडतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वाळतात. फुलकिड्यांनी केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या बुरशीस सहज शिरकाव करता येतो. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढल्यास रोगांचे प्रमाणही वाढते.

कोरडी हवा आणि २५ ते ३o o सें. तापमानात या किडीचे प्रमाण जास्त असते. करपा व फुलकिडे यांच्या एकत्रित रोग व कोड नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर १o-१५ दिवसांनी व १५ दिवसांच्या अंतराने चार फवारण्या मॅन्कोझेब (o.३ टका) किंवा काबॅन्डॅझिम (o.१ टका) हे बुरशीनाशक व डायमेथोएट ३o ईसी १३ मिलि. किंवा लॅम्बडा सायहॅलोश्रीन ५ ईसी ६ मिलेि. किंवा क्रिनॉलफॉस २५ ईसी २४ मिलि. या कीटकनाशकाच्या आलटूनपालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करताना चिकट द्रवाचा (o.१ टका) वापर जरूर करावा. काढणी: जातीनुसार आणि हवामानानुसार कांदा पक्र होऊ लागला, की नवीन पाने यायची थांबतात.

पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरू लागून कांदा घट्ट होतो. पाने पिवळसर होतात कांद्याची मान मऊ होते. पाने मानेजवळ वाकून जमिनीवर पडतात. साधारणपणे ५० टक्के झाडांच्या वाळविताना विशेषकरून एक खबरदारी घ्यावी, ती म्हणजे कांदा ढीग न करता पहिला कांदा दुस-या ओळीच्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल, अशा पद्धतीने जमिनीवर एकसारखा पसरवून पाच दिवस वाळवावा. त्यानंतर कांद्याच्या मानेला पीळ देऊन ३ ते ५ सेंमी. मान ठेवून पात कापावी. हे कांदे सावलीत दोन आठवडे पातळ थर देऊन सुकवावेत.

कांदा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील ३७ टक्के, तर देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. याशिवाय पुणे, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांतही १०.८७ लाख हेक्टर क्षेत्र असून, १७५.११ लाख टन उत्पादन मिळून १६.१० टन प्रतिहेक्टर उत्पादकता आहे.

अशा त-हेने योग्य सुकविलेल्या कांद्याची प्रतवारी करून फक्त मध्यम आकाराच्या कांद्याची साठवणूक करावी. कांद्याची काढणी फेब्रुवारी-मार्च (२० टक्के) आणि रब्बी एप्रिल- मे (६० टक्के) या महिन्यांत काढणीस येतो. सप्टेंबर-मे या कालावधीत कोणत्या तरी हंगामाची कांदाकाढणी चालू असते. जून ते सप्टेंबरपर्यंत लागते. कांदा साठवण करावयाची असेल, तर एन-२-४-१ सारख्या जातींची निवड करणे, वरखते ६० दिवसांनंतर देऊ नयेत. काढणीपूर्वी ३ आठवडे पाणी तोडणे व योग्य प्रकारे सुकवणे. साठवणुकीतील नुकसान : साठवणुकीत कांद्याचे तीन प्रकारे नुकसान होते. योग्य प्रकारे साठवण केल्यास नुकसानाचे प्रमाण कमी कमी करता येते.

वजनातील घट : मे ते जुलै या महिन्याच्या कालावधीत वातावरणातील तापमान जास्त असते. कांद्याचे श्वसनामार्फत पाण्याचे उत्सर्जन झाल्यामुळे वजनात २५-३० टक्के घट येते.

कांद्याची सड : कांदा साठवणुकीपूर्वी चांगला सुकविला नाही, तर काढणीच्या वेळच्या जखमा भरल्या नाहीत, तर त्यावर जंतूंचा संसर्ग होऊन कांदे सडतात. जुलै ते सप्टेंबर यादरम्यान वातावरणात अधिक आद्रता असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन १० ते १५ टक्के नुकसान होते.

कांद्यास कोंब येणे : खरीप हंगामातील कांदा तयार झाला तरी त्याची वाढ चालू राहते. नवीन मुळे आणि कोंब येत असतात. कांद्यामध्ये सुसावस्था येत नाही म्हणून खरीप कांदा टिकत नाही. मऊ होऊन पात आडवी होते. सुप्त अवस्था आणणारी रसायने कांद्यामध्ये उतरतात. म्हणून या हंगामातील कांदा काढल्यानंतर लगेच कोंब येत नाहीत व साठवणुकीत टिकतो. परंतु, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत कमी तापमानामुळे कांद्याची सुतावस्था संपते व कोंब आल्यामुळे १० ते १५ टक्के नुकसान होते. अशा प्रकारे कांद्याचे योग्य प्रकारे सुरुवातीपासून विविध बाबींचे तसेच पीक संरक्षण केल्यास करपा व फुलकिडींचे नियंत्रण होऊन कांदा उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होते.

 

Tags: Cultivate Rabi OnionMaharashtraOnion CultivationRabbi Sowing
SendShareTweet

ताज्या बातम्या

Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीनला गुढीपाडव्यादिवशी काय बाजारभाव मिळाला? पहा जिल्हानिहाय यादी

March 22, 2023
Cotton Market

Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कपाशीच्या फ्युचर्स किमती पहा

March 22, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात झाला बदल? शेतकऱ्यांचा गुढीपाडवा होणार गोड; चेक करा आजचे दर

March 21, 2023
हरभरा बाजारभाव

हरभरा बाजारभाव : पुढील 2 महिन्याच्या संभाव्य किंमती जाणून घ्या

March 21, 2023
Agriculture Technology

Agriculture Technology : शेतकरी घरबसल्या घेऊ शकतात कृषी योजनांचा लाभ; विम्यापासून अनुदानापर्यंतच्या सर्व सुविधा ‘या’ App वर मोफत

March 21, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला? कुठे झाली सर्वाधिक आवक?

March 20, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group