Dairy Business : दूध लुटारूंवर बसणार चाप; शासनाच्या ‘या’ निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Dairy Business) | भ्रष्टाचार (Corruption) हा फक्त शासकीय कर्मचारी आणि राजकारणी करतात असे बऱ्याचदा म्हटले जाते. परंतु भ्रष्टाचार हा कोणत्याही क्षेत्रात आपापल्या पातळीवर होत असतो. बऱ्याचदा दुधात पाणी मिसळून दुधाचे उत्पादन वाढवले जाते. अशाचप्रकारे दूध संकलन केंद्रावर (Milk Collection) देखील दुधाची योग्य पद्धतीने मोजणी न करता शेतकऱ्यांची लूट होताना दिसते. आता अशा दूध लुटारूंना चाप लावण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.

आता राज्यसरकारने दुधाच्या मोजमापासाठी मिल्कोमीटर (Milkometre) प्रत्येक दूध संकलन केंद्रावर असणे बंधनकारक करणार आहे. यासाठी शासन आता यावर अंमलबजावणी सुरु करत आहे. वजन काटे वैधता प्रमाणीकरण विभाग आणि अन्न व पुरवठा विभाग या दोन शासकीय विभागांना याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.

दूध लूटारूंना बसणार चाप

दुधाचे वजन मोजत असताना मिल्कोमीटरच्या सेटिंगला चुकीच्या पद्धतीने ऑपरेट करून शेतकऱ्यांकडून दुधाची लूट केली जात आहे. यासाठी आता किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध केंद्रावर मिल्कोमीटर लावण्याची मागणी केली. त्यानंतर ती मागणी राज्य सरकारने मान्य केली. Dairy Business

लाँग मार्चमध्ये घेतलेला मुद्दा यशस्वी

यंदाच्या मार्च २०२३ या वर्षी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च मोर्चा काढला होता. त्या मोर्चात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतकऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत दूध संकलन केंद्रावर मिल्कोमीटर आणि वजन काटे लावण्यात यावे अशी मागणी केली. ती मागणी सरकारने पूर्ण केली आहे.

error: Content is protected !!