हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो. आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवतात. अनेकदा कमी शेतजमीन असल्याने फक्त शेतीवर घर चालवणे शेतकऱ्यांना कठीण जाते. अशावेळी अनेकजण शेतीला जोडधंदा म्हणून कुकुटपालन, दुग्धव्यवसाय (Dairy Business) करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत ज्या 63 वर्षाच्या वयात दुग्धव्यवसायातून कोट्यवधी रुपये कमावत आहेत.
63 वर्षीय महिलेची वार्षिक कमाई 1 कोटींहून अधिक
काम कोणतेही असो कष्ट घ्यायची तयारी असेल तर यश हे मिळतेच. तसेच एखादा व्यवसाय सुरु करून त्यात यशस्वी होण्यासाठी वय कधीच आडवे येत नाही. बऱ्याचदा आता माझं वय इतकं झालाय मी नवीन व्यवसाय सुरु करू कि नको? मला यश मिळेल का? असे प्रश आपल्या डोक्यात येतात. परंतु गुजरात येथील नवलबहिण दलसिंगभाई चौधरी यांनी एक नवा आदर्श शेतकर्त्यांसमोर ठेवला आहे. सध्या चौधरी यांचे वय 63 वर्ष असूनही त्यांनी दुग्धव्यवसाय सुरु करून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावण्यापर्यंत मजल मारली आहे.
थेट शेतकर्यांकडूनच अशी खरेदी करा चांगले दूध देणारी जनावरे
शेतकरी मित्रांनो अनेकदा चांगले दूध देणाऱ्या गाई म्हशींची खरेदी करता आपल्याला सदर विक्रेत्याकडे जाणे मुश्किल होते. अनेकदा खरेदी विक्री मधील दलालांमुळे जनावरे महाग किमतीला खरेदी करावी लागतात. मात्र आता थेट शेतकर्यांकडूनच चांगले दूध देणारी जनावरे खरेदी करता येणार आहेत. गुगल प्ले स्टारवरील Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. यासोबत आपल्या जमिनीचा सातबारा, नकाशा आदी कागदपत्रेही अँपवरून डाउनलोड करता येतात. शिवाय जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, रोजचा बाजारभाव आदी गोष्टीही अँपवर पाहता येतात. आजच Hello Krushi इन्स्टॉल करून लाभार्थी बाणा.
130 हून अधिक गायी आणि म्हशी
नवलबेन या गुजरातमधील बनासकांठा येथील नागला गावातील रहिवासी आहेत. नवलबेनसमोर डेअरी चालवणे हे आव्हान होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी या आव्हानाचा सामना करण्याचा निर्णय घेतला. 2020-21 मध्ये त्यांनी एक कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. त्यांनी घरी दूध कंपनीही तयार केली आहे. त्यांच्याकडे 130 हून अधिक गायी आणि म्हशी आहेत.
दुग्धव्यवसायात प्रथम क्रमांक मिळवला
६३ वर्षीय नवलबेन यांना घरात ४ मुले आहेत. सर्वजण शिक्षण घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण डेअरी फार्म चालवत असल्याचं नवलबेन सांगतात. 2019 मध्ये 88 लाख रुपयांच्या दुधाची विक्री झाली. 2020, 2021 मध्ये त्याहून अधिक दुधाची विक्री चौधरी यांनी केली. जास्त दूध उत्पादनामुळे बनासकांठा जिल्ह्यात नवलबेन दुग्ध व्यवसायात पहिल्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. नवलबेन यांनी डेअरी फार्ममधून 2020 मध्ये 1.10 कोटी रुपये आणि 2021 मध्ये 1.20 कोटी रुपयांचे दूध विकले आहे.