Dairy Business : जनावरांच्या दुधात होणार वाढ; ‘या’ तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Dairy Business) : अनेक शेतकरी शेतीला पूरक म्हणुन पशूपालन करुन दुग्धव्यवसाय (Dairy Business) करत आहेत. शेतकर्‍यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार सतत विविध योजना आखत असते. तसेच देशातील कृषी विद्यापिठे शेतकर्‍याचे प्रश्न सोडवण्याकरता विगवेगळ्या गोष्टींवर संशोधम करत असतात.

जनावरांच्या अधिक सक्षम जाती निर्माण व्हाव्यात, त्यांच्या दुध देण्याच्या क्षमतेत वाढ व्हावी यासाठी राज्यात सरकारतर्फे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. देशातील अनेक संस्था यासाठी काम करत आहेत. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (NDRI कर्नाल) ने IVF क्लोनिंग तंत्राद्वारे सर्वाधिक दूध उत्पादन असलेल्या मुर्राह म्हशीचे दोन क्लोन तयार केले आहेत. यामुळे जनावरांच्या दुध देण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल असे म्हटले जात आहे.

जनावरांची खरेदी विक्रीसाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

क्लोनींग तंत्र

लवकरच मध्यप्रदेशचे हे कुक्कुट विकास महामंडळ क्ललोनिंगचे तंत्र महाराष्ट्रात आणणार आहे. प्राण्यांच्या जाती सुधरवण्यासाठी या आयव्हीएफ तंत्राचा वापर केला जातो. याच आयव्हीएफ तंत्राचा वापर करून प्रयोगशाळेत हेलस्टन फ्रीशियन जातीच्या गायीचा जन्म झाला आहे.

दूध उत्पादन सुधारवण्यासाठी आयव्हीएफ या क्लोनिंग तंत्रज्ञानाचे मोठे पाऊल आहे. आज पशूसंवर्धनाच्या विकासावरील, आव्हानांवर आधुनिक तंत्राने मात करणे हे प्राणीशास्त्रज्ञांच्या प्रयत्नाचे यश आहे. क्लोनिंग या प्रक्रियेत IVF प्रयोगशाळेत जनावरांच्या पेशींचे संवर्धत केलं जातं. (Milk Production)

मुर्हाह म्हैस रोज देते १६ लिटर दूध

संवर्धित पेशी कत्तलखान्यातील अंडाशयातील डिन्यूक्लेटेड अंड्याशी मिळती – जुळली आहेत का पाहतात. या प्रक्रियेच्या 8 व्या दिवशी गर्भाची निर्मिती तयार होते. यानंतर भ्रूण म्हशीच्या गर्भाशयात हस्तांतरित केले जाते. यानंतर, क्लोन केलेले रेडकू जन्माला येतात, जी दिसायला अगदी सामान्य म्हशींसारखी असतात. यामुळे भविष्यात या जनावरातून मिळणारे दूध किंवा त्यांच्या शरीराची वाढ अधिक होते. आज ब्राझील सारखे देश मुर्राह म्हशीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करत आहेत. एक सामान्य मुर्राह म्हैस दररोज 15 -16 लिटर दूध देते, म्हणून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे.

error: Content is protected !!