Dalimb Rate : निसर्गाने जर साथ दिली आणि शेतकऱ्याच्या पिकाला जर योग्य भाव मिळाला तर शेतकरी (Farmer) चांगले पैसे कमावू शकतो. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. आता टोमॅटोनंतर डाळिंबाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी देखील आनंदात आहे.
मागच्या ९ वर्षांपासून नाशिक मधील लासलगाव बाजार समितीमध्ये डाळिंबाचे लिलाव सुरू झाले आहेत. १३ जुलैला या ठिकाणी डाळिंब लिलावास प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्याचा डाळिंबाला चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. १३ जुलैरोजी पहिल्याच दिवशी दिवसभरात २९९ क्रेट आवक झाली. (Dalimb Rate)
‘या’ ठिकाणी करा बाजारभाव चेक
शेतकऱ्यांनो तुम्हाला जर शेतमालाचे रोजचे बाजारभाव चेक करायचे आहेत तर मग लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्ही रोजचे बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर सरकारी योजना, हवामान अंदाज, जमिनीची खरेदी विक्री तसेच पशूंची खरेदी विक्री याची माहिती देखील अगदी मोफत मिळवू शकता.
प्रतिक्रेट किमान २०० ते कमाल ५१०० व सरासरी २०११ रुपये याप्रमाणे दर मिळाला. डाळिंबाला यावेळी चांगले दर मिळाले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डाळिंबाच्या कॅरेटला सरासरी २ हजार ११ रुपये एवढा भाव मिळाला. यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक मधील लासलगाव बाजार समितीमध्ये येवला, सटाणा, कळवण, चांदवड, देवळा,मालेगाव व सिन्नर, त्याचबरोबर नगर जिल्ह्यांतील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा या ठिकाणहून डाळिंब येत आहेत.