हॅलो कृषी ऑनलाईन: मध्य महाराष्ट्रातील काही भागात (Dangi Rain) आज 27 जून पासून पुढील आठवडाभर म्हणजेच 4 जुलैपर्यंत डांगी पावसाचा (Dangi Rain) जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या माहितीनुसार समजले आहे. विशेषतः, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि उत्तर नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे (Monsoon Prediction).
गुजरात राज्याच्या पश्चिमेकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजेच डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या पावसाला ‘डांगी पाऊस’( Dangi Rain) असे म्हटले जाते
हवामान तज्ज्ञ (Meteorologist) माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांच्या मते, अरबी समुद्राच्या पश्चिमेकडून येणाऱ्या डांगी पावसामुळे हे बदल घडून येत आहेत. याच पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित भागात आणि पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये रविवार (30 जून) पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने (IMD) आजपासून ते 29 जून या काळात कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रात (Maharashtra Rain) काही निवडक भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.
मुंबईसह कोकण आणि विदर्भात रविवार (30 जून) पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी आहे.