शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! DAP ला पर्याय ठरेल का PROM? काय आहे हा नवा प्रयोग?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डीएपी DAP म्हणजेच डाय अमोनिअम फॉस्फेट या खताचा शेतकरी सर्रास वापर करतात. मात्र अनेकदा या खताची टंचाई जाणवते. हरियाणा राज्यातील कृषी विभाग यावर पर्याय शोधण्याच्या तयारीत आहे. हरियाणाचे कृषी मंत्री जे. पी दलाल यांनी सांगितले की, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या फॉस्पेट रिच ऑरगॅनिक मॅन्युअर (phosphate Risch Organic Manure) म्हणजेच प्रोम PROM हे डीएपी ला पर्याय होऊ शकते. याला कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी कृषी विभाग, पशुपालन विभाग, गो -सेवा आयोग ,हरियाणा कृषी विशवविद्यालय यांच्यासोबत विचार विनिमय केला आहे.

हरियाणामध्ये रब्बी हंगामाच्या वेळी डीएपी खताच्या टंचाईचे संकट आलं होतं. यावेळी पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया याचा वापर करण्यात आला होता आता खरीप हंगाम जवळ येत तर कृषी मंत्री डीएपी ला पर्याय म्हणून प्रोम खताच्या PROM पर्यायाबद्दल सांगत आहेत. मात्र हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की शेतकरी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांना पसंती देतात का?

खत खरेदी करताना असे वाचवा पैसे अन वेळ

शेतकरी मित्रांनो आपल्या गावाच्या जवळपास अनेक खतांची दुकाने असतात. परंतु प्रत्येक दुकानदाराचा आपल्याकडे संपर्क क्रमांक नसतो. तसेच अनेकदा आपण औषध आणायला जातो परंतु दुखणदाराकडे ते उपलब्ध नसते. अशावेळी जर आपण अगोदर खत दुकानदारही फोनवरून संपर्क साधला तर आपला वेळही वाचू शकतो अन पैसेही. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi मोबाईल अँप अतिशय उपयोगी आहे. इथून शेतकरी आपल्या जवळच्या सर्व खतदुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क साधू शकतो. तसेच आपल्याला हव्या असलेल्या वस्तू थेट दुकानदाराकडून Online ऑर्डरही करू शकतो. सोबत सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्रेही Hello Krushi वर डाउनलोड करता येतात. आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा अन या सेवेचे लाभार्थी बना.

कुठे तयार होत आहे प्रोम (PROM)

हरियाणाचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी सांगितले की PROM हे खत पिंजोर येथील हिसार आणि भवानी गोशाळेमध्ये तयार केलं जात आहे. या खताची तपासणी आय आय टी एच यु लॅब मध्ये झाली आहे. त्यांनी सांगितले की हरियाणा कृषि विश्वविद्यालय, हरियाणा कृषी विभाग देखिलिया खताची ट्रायल करणार आहे. कारण देशासाठी हा एक क्रांतिकारक निर्णय होऊ शकतो. त्यांनी दावा केला आहे की प्रोम खताची जर ट्रायल यशस्वी झाले तर देशाच्या शेती क्षेत्रातील हे खूप मोठे पाऊल असेल.

प्रोम साठी वेगळी टीम कार्यरत

जेपी दलाल यांनी सांगितले की प्रेम PROM खत प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एक टास्क फोर्स टीम निवडण्यात आली आहे. ज्याच्या मध्ये कृषी विभाग गोसेवा आयोग आणि हरियाणा कृषि विश्वविद्यालय याचे अधिकारी यांचा सहभाग आहे. ही टीम खाता विषयी आपले रिपोर्ट देईल. गायीच्या शेनापासून रंग, खत गॅस इत्यादी उत्पादने बनवण्याचा काम सुरू आहे. यासाठी देशातील विविध कंपन्यांनी गॅस साठी गो शाळेशी करार देखील केले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!