चार कुटुंबावर दुःखाचा डोंगर ! विद्युत वाहिनी जोडताना शॉक लागून मजुरांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड येथील हिवरखेडा नांदगीर वाडी या भागातील शिवारात नवीन डीपी बसवण्याचं काम सुरू होते . या नवीन डीपीला विद्युत वाहिन्या जोडत असताना विजेचा धक्का लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या चारही मजुरांच्या कुटुंबावर काळोख पसरलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नांदगीर वाडी शिवारात नवीन डीपी बसवण्याचं काम सुरू होतं अशावेळी अर्जुन बाळकृष्ण मगर, भारत बाबासाहेब वरकड, गणेश नारायण थेटे आणि जगदीश छगनराव मुरकुंडे हे तारा ओढण्याच्या मजुरीच्या कामावर होते. मात्र दुपारी हे चौघे डीपीला विद्युत पुरवठा करण्यासाठी अकरा केवी वाहिनी जोडण्याचा काम करत होते. तारेचे पहिले टोक घेऊन गणेश हा सहा पोल पर्यंत पोहोचला असताना त्यात अचानक विद्युत प्रवाह उतरला अशातच पावसामुळे जमीन ओलसर होते त्यामुळे जबरदस्त शॉक लागून चौघेही जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेत आदिनाथ बाळकृष्ण मगर, भारत बाबासाहेब वरकड, गणेश नारायण थेटे, जगदीश छगनराव मुरकुंडे अशा चौघांचा मृत्यू झाला असून पप्पू शब्बीर पठाण वय वर्ष 30 हा गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती कळताच नावडी गावावर शोकक कळा पसरली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद अगाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी आर भालेराव, उपकार्यकारी अभियंता नितीन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान नावडी येथील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!