ओला दुष्काळ जाहीर करा, संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या : मोर्शीत रास्ता रोको आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु असताना अमरावतीत विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अमरावती-नागपूर महामार्गावरील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी अशा मागण्या करण्यात आल्या.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं मोर्शी-वरुड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहेत मागण्या ?

— शेतीचे संपूर्ण पिककर्ज माफ करुन संत्रा गळतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये द्यावेत.
— खरीप पिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!