Devendr Fadanvis : सध्या राज्यभर पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची खरीप पिके वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे या ठिकाणी तर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांकडे पिकांना देण्यासाठी विहिरीचे पाणी आहे. त्यावर शेतकरी पीक जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्येच महावितरणाकडून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. आता या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवीन असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके वाया जाऊ लागली आहेत. पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी काही शेतकऱ्यांकडे विहिरीमध्ये पाणी उपलब्ध असल्याने ते त्या पाण्यावर पिके जगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महावितरणाकडून वीज पुरवठा सुरळीत होत नाही त्याचबरोबर महावितरणातून आवश्यक साहित्याचा पाठपुरवठा देखील केला जात नाही. याच दृष्ट चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांना सांगिलती.
त्यानंतर या बैठकीतून आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला यावेळी देवेंद्र फडणीस यांनी महावितरण अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवीन असा गंभी इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर
सप्टेंबर महिना सुरू होऊन एक दिवस उलटला आहे तरीही म्हणावा असा पाऊस पडला नाही यामुळे शेतकऱ्यांचे खरी पीक वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कपाशीची तर सध्या बिकट स्थिती आहे. कपाशीला फुले लागण्याच्या स्थितीत पाणी कमी पडल्यामुळे फुल गळती देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर फळबागा देखील सुकून चालल्या आहेत. शेतकरी टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागेला देत असल्याचे पाहायला मिळत आहे.