Dhanjay Munde : ब्रेकिंग! बोगस खतं विक्री करणाऱ्या ‘या’ कंपनीचा परवाना रद्द; कृषिमंत्री धंनजय मुंडे यांनी दिली माहिती

0
2
Dhanjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dhanjay Munde : बोगस खते आणि बि-बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते, त्यामुळे अधिक खर्च होऊन शेतकऱ्यांना याचा मोठा फटका देखील बसतो. मागच्या काही दिवसापासून बोगस खतांचा विषय चर्चेत आहे. यावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गदारोळ झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. त्यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस खते आणि बियाणांच्या कंपन्यांवर नवीन कायदा आणणार असल्याची माहिती दिली होती. यामध्येच आता शेतकऱ्यांनी केलेल्या वारंवार तक्रारीनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका कंपनीचा परवाना रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

‘या’ कंपनीवर केली मोठी कारवाई?

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज (Greenfield Agrichem Industries) या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बोगस बि-बियाणांसाठी एक नंबर दिला आहे. ज्यावर आपण कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कृषीमंत्री धंनजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हंटल आहे कृषिमंत्र्यांनी ट्विटमध्ये? (Dhanjay Munde Tweet)

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून (Dhule News) तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे.

बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही. या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे ही विनंती. असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना या नंबरचा मोठा फायदा होणार आहे.