Donkey Milk: गाढविणीच्या दुधाला ‘येथे’ मिळतोय 15,000 रुपये लिटर भाव; अंगणातच काढू दिली जाते धार!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या दुधाला (Donkey Milk) भाव नाही म्हणून काही ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farmers) आक्रमक झाले आहेत आणि आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर आज आम्ही तुम्हाला एक अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल.

अचानक घरी असताना किंवा रस्त्यावर जाताना तुम्हाला जर ‘गाढविणीचे दूध घेता का, दूध”, (Donkey Milk) असा आवाज आला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल यात शंका नाही. एवढेच नाही तर हे गाढविणीचे दूध पंधरा हजार रुपये लिटरने (Donkey Milk Price) विकले जात आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील स्टेशन (उमरी) येथील सीताबाई नामक महिला एक गाढव घेऊन दारोदारी जाते आणि अनेक रोगांसाठी ‘रामबाण’ उपाय असा दावा करीत गाढविणीचे दूध घ्या, अशी हाक देते. अनेकांना याचे आश्चर्य तर वाटतेच आहे. त्यात काहींना हे दूध घ्यावे वाटतंय. तर काहींना गाढविणीचे दूध (Donkey Milk) कसे प्यावे म्हणून लाज वाटते.

या सगळ्या शंका-कुशंका, काहीही असले तरी ‘गाढविणीचे दूध’ सध्या विक्रीला तुमच्या दारात येतेय हे मात्र खरे.

अंगणातच काढून दिली जाते धार

सीताबाई गेल्या दोन दिवसांपासून बाळापूर परिसरात गाढविणीचे दूध (Donkey Milk) घरोघरी जाऊन विकत आहेत. त्या दुधाचे महत्त्व सांगतात. औषध म्हणून हे दूध किती उपयुक्त आहे, याची माहिती देत आहे. पन्नास रुपये, शंभर रुपये, दोनशे रुपये तुम्हाला जितके हवे तितके दूध लगेच तुमच्या अंगणात धार काढून देते.

त्यासाठी तिचे मोजमाप ठरलेले आहे. माझी गाढवीण आमच्या विश्वासावर पान्हा पाहिजे तेव्हा सोडते असेही तिचे म्हणणे आहे. तिच्याकडे अशा तीन ते चार व्यालेल्या गाढविणी आहेत. अनेकजण हे दूध शोधत येतात. पण ऐनवेळी मिळत नसते. सध्या मात्र चार गाढविणी व्यालेल्या असल्यामुळे ते उपलब्ध आहे म्हणून विकते असे ती सांगते.

दमा, पोटदुखीवर उपयुक्त गाढविणीचे दूध (Donkey Milk Benefits)

दोन दिवसांपासून आखाडा बाळापूर आणि परिसरातील गावांमध्ये एक महिला हातात गाढविणीला धरून दारोदारी आवाज देते. दमा, खोकला, लहान लेकराच्या पोटातले येणे, पित्त, अंग खाजणे, पित्ताशयाचे आजार अशा अनेक रोगांवर जालीम उपाय म्हणून गाढविणीचे दूध (Donkey Milk) औषध असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे.

आजपर्यंत फळे, पालेभाज्या, दूध, दही, ताक, लोणी, तूप, हे विक्री करण्यासाठी अनेकदा आवाज ऐकले. ते अंगवळणीही पडलेत पण ‘गाढविणीचे दूध घ्या’ हे आवाज मात्र माणसाला आश्चर्यकारक वाटत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.