हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसाठी पाणी (Drought) आणि वीज नसेल तर शेतीची कल्पना केली जाऊ शकत नाही. यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे या भागात पाण्याला किती महत्व प्राप्त झाले आहे हे एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोदवड गावातील रामेश्वर गव्हाणे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पाण्याची चोरी होऊ नये. म्हणून शेतात चक्क सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. त्यामुळे यातून या भागातील दुष्काळाची दाहकता स्पष्ट होत असून, शेतकऱ्यांना आता आपल्या शेतातील पाणी चोरी (Drought) होऊ नये. म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पाणीटंचाईची परिस्थिती बिकट (Drought In Maharashtra)
शेतकरी रामेश्वर गव्हाणे यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, यावर्षी मराठवाड्यात पाण्याची खूपच भीषण परिस्थिती आहे. यंदा खूपच कमी पावसाळा झाला. ज्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गंभीर दुष्काळाला (Drought) सामोरे जावे लागले. आतापर्यंत आपल्या शेतातून कोणतेही पाणी चोरी झालेले नाही. मात्र, मॉन्सूनचा पाऊस झाल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते.
शेतकऱ्याचा खबरदारीचा उपाय
हीच गोष्ट लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आपण शेतात पाणी (Drought) चोरी होऊ नये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. या कॅमेरामुळे आपल्या पाणी चोरीला सामोरे जावे लागणार नाही. इतकेच नाही तर दीड एकरात आपण मिरची लागवड केली आहे. ज्यात जनावरांचा मोठा त्रास होतो. ज्यामुळे होणारे नुकसान टळण्यास देखील मदत होत आहे. या सीसीटीव्हीच्या स्क्रिनशॉटद्वारे आपल्याला थेट मोबाईलवर माहिती मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका शेतीला
दरम्यान, सध्या पाण्याची चोरी रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागत आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा शेती क्षेत्राला बसणार आहे. शेतीसाठी भूजलाचा सर्वाधिक वापर केला जातो. काही कृषी संस्थांच्या मते, भारतातील 90 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. केंद्रीय जल आयोगानुसार 2000 मध्ये वापरण्यात आलेल्या एकूण पाण्यापैकी 85.3 टक्के पाणी शेतीसाठी वापरले गेले. त्यामुळे आता अनेक राज्ये कमी पाणी वापरणाऱ्या अशा पिकांवर आणि वाणांवर लक्ष केंद्रित करत आहेत.