हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच (Drought In Maharashtra) वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांबरोबर जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांची उभी पिके करपू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील 3500 हेक्टरवरील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी बागांवर कुऱ्हाड (Drought In Maharashtra) चालवली आहे.
कृषी विभागाचा अहवाल सादर (Drought In Maharashtra)
दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील 3500 हेक्टरवरील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर 2500 हेक्टरवरील मोसंबीच्या बागा जळाल्या आहेत. जालना कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालातुन ही माहिती समोर आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्यात आला आहे.
पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड
जालना जिल्ह्यात भीषण अशा दुष्काळाच्या झळा बसत असून, जवळपास 3500 हेक्टर वरील फळबागा नष्ट झाल्या असून, त्यापैकी अडीच हजार हेक्टर मोसंबी बागा जळाल्याच समोर आले आहे. अनेक शेतकरी पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. दुष्काळामुळे या फळबागा करपून गेल्याचे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे.
पाण्याचा प्रश्न भीषण
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी अपेक्षीत प्रमाणात पाऊस झाला नव्हता. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. धरण, तलाव, नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा नव्हता. जेवढा साठा होता, तेवढा साठा आता संपत आला आहे. अनेक ठिकाणी धरणे, नदी नाले तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तसेच पाणीच नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.