Drought In Maharashtra : दुष्काळामुळे आचारसंहिता शिथील होणार; येत्या 48 तासांत निर्णयाची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या 48 तासांत राज्यातील आचार संहिता शिथिल होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात दुष्काळसदृश्य (Drought In Maharashtra) परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांनी तळ गाठल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचसोबत काही भागांत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर (Drought In Maharashtra) आता येत्या 48 तासांत निवडणूक आयोगाकडून राज्यातील निवडणूक आचार संहिता शिथील केली जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी (Drought In Maharashtra)

राज्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु असल्याने सरकारी पातळीवर मोठे निर्णय घेता येत नाहीये. तसेच राज्य सरकारमधील मंत्र्यांना पाहणी दौरेही करता येत नाहीत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली या आठवड्याच्या सुरुवातीला केली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या निर्णयाचा गांभीर्याने विचार केला असून, येत्या 48 तासांत आचार संहिता शिथील केली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे आचारसंहितेचा नियम?

देशात लोकसभा निवडणुका जाहीर होताच, निवडणूक आचारसंहिता लागू होते. तर, नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते. या काळात देशभरात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करू शकत नाही. परिणामी, लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. निवडणूक निकालानंतर 8 ते 10 दिवसांत नवे सरकार स्थापन होईल. आचारसंहितेमुळे सरकारचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांच्या पत्रानंतर आचारसंहितेच्या निर्बंधातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!