Goat Breed: शंभर किलो वजनाची ‘दुंबा शेळी’ जाणून घ्या वैशिष्ट्ये!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीव्यतिरिक्त पशुपालन (Goat Breed) हा असा एक पर्याय आहे जो शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यास मोठा हातभार लावतो. आज जाणून घेऊ या शेळी पालनामध्ये (Goat Farming) एका महत्त्वपूर्ण शेळीच्या जातीची माहिती, जिचे नाव आहे दुंबा शेळी (Dumba Goat).

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमरोहा जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुंबा (Goat Breed) शेळीपालन करत आहेत. या माध्यमातून अनेक शेतकरी दरवर्षी लाखो रूपयांची कमाई करतात.

या जातीच्या बोकडाला ईदच्या दिवशी खूप मागणी असते. त्याला किंमत देखील चांगली मिळते.

त्यामुळे शेळी पालन करणाऱ्या शेतकर्‍यांमध्ये ती लोकप्रिय आहे. या जातीचा नर देखील तेवढाच शेळी पालकांच्या पसंतीचा असून या जातीच्या शेळीची (Goat Breed) पिल्ले देखील मोठ्या प्रमाणात विकली जातात.

दुंबा शेळीची वैशिष्ट्ये

  • दुंबा शेळी (Goat Breed) नऊ महिने ते एक वर्षाच्या कालावधीत पिल्लांना जन्म देते. एकावेळी एकाच पिल्लाला जन्म देते.
  • सुरुवातीच्या दोन महिन्यात पिल्लांचे वजन 25 किलो होते. या जातीची पिल्ले दिसायला खूप आकर्षक दिसतात व त्यांना चांगली किंमत मिळते.
  • एका वर्षात वर्षाच्या कोकराचे वजन सुमारे शंभर किलो होते असे शेतकरी सांगतात.

दुंबा जातीच्या शेळीच्या पिल्लांची किंमत (Dumba Goat Price)

या जातीच्या (Goat Breed) शेळ्यांच्या पिल्लांची किंमत दोन महिन्यात तीस हजार रूपयांवर जाते मात्र तीन ते चार महिने होतात त्यांची किंमत 70 ते 75 हजार रूपयांपर्यंत जाते.

या जातीच्या शेळीची किंमत ही नर किंवा मादी या दराने मिळत नसून तिच्या वैशिष्ट्यांवर मिळते. परंतु मादी दुंबाला चांगली किंमत मिळते.