राज्यातील ‘या’ भागाला भूकंपाचे सौम्य धक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सकाळी राज्यातल्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. कोयनेच्या भुकंपमापन केंद्रावर 4 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. भूकंपमापन केंद्रापासून 136 किमी अंतरावर भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानीची अद्याप नोंद नाही.

सोलापूरात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यानजीक असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. भूकंप झाल्यानंतर कुठे काय घडलं आहे का ? याची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. सकाळी 6.22 वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकतील विजापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागात सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे

Leave a Comment

error: Content is protected !!