Eggs Production : देशातील अंडी उत्पादन वाढले; महाराष्ट्राला पहिल्या ‘पाच’ मध्ये स्थान नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ (Eggs Production) ही जाहिरात अनेकदा ऐकली असेल. मात्र आता प्रत्यक्षात ही जाहिरात खरी ठरली आहे. कारण देशातील अंड्यांच्या उत्पादनात (Eggs Production) मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘पशुपालन सांख्यिकी अहवाल 2023’ मध्ये याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 2021-22 या वर्षात देशभरात 750 कोटी अंड्यांचे उत्पादन (Eggs Production) झाले होते. ज्यात 2022-23 या वर्षात मोठी वाढ होऊन, ते 900 कोटींहून अधिक नोंदवले गेले आहे. अर्थात यावर्षी अंडी उत्पादनात 6.77 टक्क्यांनी वाढ झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत 150 कोटींहून अधिक अंडी उत्पादित झाली आहेत. दरम्यान मागील पाच वर्षात देशातील अंडी उत्पादनात 33.31 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी अर्थात 2021-22 मध्ये अंडी उत्पादनात 6.19 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली होती. केंद्र सरकारचा हा अहवाल पशु-एकीकृत नमुना सर्वेक्षणावर (मार्च 2022 ते फेब्रुवारी 2023) आधारित आहे.

आंध्रप्रदेश प्रथम स्थानी (Eggs Production In India)

या अहवालानुसार, अंडी उत्पादनाच्या बाबतीत आंध्रप्रदेश या राज्याने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. मात्र, आंध्रप्रदेशात यावर्षी अंडी उत्पादनात अल्पशी घट नोंदवली गेली आहे. 2022-23 मध्ये देशातील एकूण अंडी उत्पादनापैकी सर्वाधिक 20.13 टक्के वाटा आंध्रप्रदेशच्या राहिला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 20.41 टक्के इतका राहिला होता. यावर्षीच्या अहवालानुसार तामिळनाडू -15.58 टक्के, तेलंगणा- 12.77, पश्चिम बंगाल- 9.94, आणि कर्नाटक- 6.51 टक्के वाट्यासह या राज्यांनी पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान पटकावले आहे.

आरोग्याबाबत जागरूकता

दरम्यान, आरोग्याबाबत जागरूकता असणाऱ्या ग्राहकांची उत्तरोत्तर वाढ होत असून, कमी खर्चात अधिक प्रोटीन मिळवण्यासाठी देशातील अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. दररोज एका व्यक्तीने 2 अंडी खाणे आवश्यक आहे. मात्र असे असले तरी मागणीच्या बाबतीत आपण बरेच मागे आहोत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रति व्यक्तीने वार्षिक 180 अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. असे पोल्ट्री उद्योगातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!