हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या अंडयाच्या दर (Eggs Rate) घसरणीला आज ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. देशातील अनेक शहरांमधील अंडी दर हे मागील काही दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर आज 15 ते 20 रुपये प्रति शेकड्याने वाढले आहेत. थंडी आणि अंडी दर यांचा जवळचा संबंध असल्याने, देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट पसरली आहे. याच थंडीच्या लाटेचा फायदा अंडी दरात वाढ होण्यास झाला आहे. चालू महिन्यातील ही अंडी दरातील (Eggs Rate) पहिलीच वाढ असून, त्यामुळे यात आणखी वाढ होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)
मागील आठवड्यात असलेल्या दरांच्या तुलनेत आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) शेकडा 15 ते 20 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्यांचे शेकडा दर पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (601), पुणे (603), नागपूर (563) वाराणसी (627), लखनऊ (650), पटना (630), अलाहाबाद (629), कोलकाता (630), कानपुर (609), रांची (619), अहमदाबाद (590) , चेन्नई (570), बंगळुरू (565), विजयवाडा-आंध्रप्रदेश (555). दरम्यान, मागील आठवड्याच्या शेवटी असलेले 550 ते 590 रुपये प्रति शेकडा अंड्याचे दर आज 600 ते 630 रुपये प्रति शेकडापर्यंत वाढले आहेत.
थंडीसोबतच अंडी दरातही वाढ
उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. काही भागात किमान तापामानात मोठी घट झाली आहे. परिणामी, थंडीपासून बचाव करण्यासाठी प्राधान्याने अंड्यांचे सेवन करणाऱ्या ग्राहकांकडून मागील तीन ते चार दिवसांमध्ये मागणीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. मागणीतील ही वाढ लेअर पोल्ट्री उत्पादकांसाठी दिलासादायक ठरली आहे. खाद्य दराच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्चही निघत निघत नसताना, या अंडयाच्या अल्प दर वाढीमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.