Electric Bull : चिंता सोडा… आता ‘इलेक्ट्रिक बैल’ करणार सर्व शेतीची कामे; इंधन खर्च शून्य!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेती करताना बैल पाहायला मिळणे अत्यंत दुर्मिळ गोष्ट (Electric Bull) झाली आहे. अनेक शेतकरी यांत्रिक पद्धतीने शेती करत आहे. मात्र यांत्रिक पद्धतीने शेती करायलाही काही मर्यादा असतात. ऐन पावसाळयाच्या दिवसात शेतकऱ्यांना वाफसा नसेल तर मोठ्या यंत्रांनी पीक पेरणी उशीर होतो. तसेच पेरणी लांबणीवर पडते. मात्र आता हाच विचार करून एक ‘इलेक्ट्रिक बैल’ तयार करण्यात आला आहे. जो तुम्हाला पेरणी, कोळपणी, स्लरी, कीटकनाशकांची फवारणी (Electric Bull) करण्यासाठी मदत करणार आहे.

लक्षवेधी ‘इलेक्ट्रिक बैल’ (Electric Bull For Agriculture Work)

सध्या पुणे जिल्ह्यातील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र (मोशी) येथील किसान प्रदर्शनात हा ‘इलेक्ट्रिक बैल’ ठेवण्यात (Electric Bull) आला आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडे दावणीला सहा ते आठ बैल असायचे. त्याद्वारे शेती क्षेत्र मोठे असणारे शेतकरी मोट आणि लोखंडी नांगराच्या साहाय्याने शेतीतून उत्पादन घेत होते. मात्र अलीकडच्या काही दशकांमध्ये इलेक्ट्रिक मोटारचा शोध लागून, शेती करणे सुखकर झाले. आता असाच काहीसा नवीन शोध लावत शेती करण्यासाठी इलेक्ट्रिक बैल तयार करण्यात आला आहे. ज्याच्या वापरातून शेती करणे शेतकऱ्यांना सुखकर होणार आहे. मोशी येथील किसान प्रदर्शनात अनेक शेती उपयोगी साहित्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. मात्र हा इलेक्ट्रिक बैल येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

इंधन खर्च नाही

सध्या शेती क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत. त्यातील मजूर टंचाई आणि बैलांची कमी झालेली संख्या ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या मानली जात आहे. मात्र आता बैलाच्या मार्फत शेतातील जी कामे केली जातात ती सर्व कामे या यंत्राद्वारे केली जात आहेत. हे यंत्र चार्जिंग करून काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांना चारा आणि पाणी टंचाईत चारा विकत घेण्याची गरज नाही. देखभाल खर्च अल्प प्रमाणात आणि एकाच यंत्रामध्ये वेगवेगळी कामे होत असल्यामुळे हे यंत्र फायद्याचे ठरत आहे. या यंत्रासाठी कोणत्याही प्रकारच्या इंधनाची गरज लागत नाही. हे यंत्र इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालत असल्यामुळे शेतकऱ्यांना यासाठी जास्त खर्च येत नाही.

error: Content is protected !!