Electric Tractor 3.0 : शेतकऱ्याने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, फक्त 10 रुपयांत चालतो तासभर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता इलेक्ट्रिक (Electric Tractor 3.0) वाहनांकडे अनेकांचा कल वाढला आहे. बऱ्याच कंपन्यांनी विविध इलेकट्रीक वाहने बाजारात आणली आहेत. मग कृषी क्षेत्र कसे बरे मागे राहील ? शेतकरी मित्रांनो किफायतशीर इलेकट्रीक ट्रॅक्टर निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची बरीच चर्चा सध्या वाहन उद्योगात सुरु आहे. मात्र हा ट्रॅक्टर कोण्या कंपनीने तयार केला नसून गुजरात मधल्या शेतकरी इंजिनिअरने केला आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर केवळ १० रुपयात १ तास काम करू शकतो असा दावा या ट्रॅक्टर च्या निर्मात्यांनी केला आहे.

गुजरातमधील शेतकरी अभियंता निकुंज कोरात आणि त्यांचे बंधू मारुत ई-ट्रॅक्ट 3.0 हे मिनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor 3.0) तयार केला आहे. साधारणपणे ट्रॅक्टर ऑटोमोबाईल कंपन्या तयार करतात. मात्र या शेतकरी अभियंत्याने हा पराक्रम करून सर्वांनाच चकित केले आहे. निकुंजने मीडियाला सांगितले की, मारुत इलेक्ट्रिक-ट्रॅक्ट 3.0 एका चार्जवर 6 ते 8 तासांची ड्युटी रेंज देते. निकुंजच्या म्हणण्यानुसार, हे 4 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. हा मिनी ट्रॅक्टर अवघ्या 10 रुपयांमध्ये एक तास शेतात काम करू शकतो.

गुजरातमधील शेतकरी अभियंता निकुंज कोरात आणि त्यांच्या भावांनी हा ट्रॅक्टर बनवण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.या इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टरला नुकतेच ICAT (इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी) द्वारे प्रमाणित केले गेले आहे.

किंमत किती आहे?

ट्रॅक्टरची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये (Electric Tractor 3.0) ठेवण्यात आली आहे. आता तरुण अभियंत्यांच्या टीमने या छोट्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया (FAME) कडून अनुदानाची मागणी केली आहे जेणेकरून हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना कमी किमतीत विकता येईल.

कशी सुचली कल्पना

चार वर्षांपूर्वी देशात इलेक्ट्रिक रिक्षांचा कल वाढला होता. जे पाहून निकुंजने इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवण्याचा विचार केला. निकुंज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, देशातील शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन कमी होत आहे. शेतीची नांगरणी कमी असल्याने शेतकरी जास्त पॉवर असलेले ट्रॅक्टर घेण्याचा धोका पत्करत नाहीत.

इंजिन(Electric Tractor 3.0)

या ट्रॅक्टरमध्ये 3 किलोवॅटची मोटर आहे. आणि PTO क्षमता 7.5 kW आहे. या ट्रॅक्टरला 4+4 फॉरवर्ड आणि रिव्हर्स गियरसह यांत्रिक स्टीयरिंग मिळते.मजबूत पकडीसाठी ड्राय ब्रेक देखील दिला गेला आहे. मारुत ई-ट्रॅक्ट 3.0 मिनी ट्रॅक्टरला स्लाइडिंग मेश प्रकारचे ट्रान्समिशन मिळते जे सिंगल फ्रिक्शन क्लचसह येते. या ट्रॅक्टरचा कमाल वेग १६ किमी/तास आहे.

error: Content is protected !!