हॅलो कृषी ऑनलाईन : डिझेल आधारित ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. त्यामुळे सरकारकडून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या (Electric Tractor) निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. सध्या देशात 50HP पेक्षा कमी क्षमतेच्या डिझेल आधारित ट्रॅक्टरवर TREM IIIA उत्सर्जन नियम लागू आहे. तर 50HP पेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरवर TREM IV उत्सर्जन नियम लागू आहे. परिणामी देशात 41-50HP ट्रॅक्टरचे मार्केट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या लागू असलेले हे नियम 2026 पर्यंत राहणार आहेत. त्यानंतर देशातील ट्रॅक्टर उद्योगाला नवीन उत्सर्जन नियम लागू होतील. त्यामुळे डिझेलआधारित ट्रॅक्टर महागडे होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती मिनी ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या (Electric Tractor) मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता ट्रॅक्टर जगतातुन व्यक्त केली जात आहे.
का वाढणार मागणी? (Electric Tractor Demand Will Increase)
ट्रॅक्टर उद्योगातील जाणकारांच्या मते, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे काम हे मुख्यतः दोन वेळांमध्ये चालते. सकाळी 4 ते 5 तास शेतकरी काम करतात. त्यांनतर दुपारी स्वतःसह ट्रॅक्टरला आराम देत पुन्हा कामाला जातात. अर्थात मधील रिकाम्या वेळात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चार्जिंग करता येऊ शकतो. सध्या बाजारात येत असलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवताना कंपन्या देखील हाच मोटो लक्षात घेऊन एका वेळी चार्जिंग केल्यानंतर ट्रॅक्टरला 4-5 तास कार्यक्षमता प्रदान करत आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या वेळा लक्षात घेऊन कंपन्यांकडून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझाईन केले जात आहे.
कारपेक्षाही अधिक यश मिळणार
इलेक्ट्रिक कारपेक्षाही इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अधिक यश मिळणार आहे. कारण इलेक्ट्रिक कार फास्ट चार्जिंग होण्यासाठी उच्च होल्टेज (40, 450, 750 वोल्ट) वर काम करते. मात्र ट्रॅक्टरला केवळ 72 वोल्टवर चार्जिंग करण्याची गरज असणार आहे. जसे की सध्या ई-रिक्षा चार्जिंग करून, चालवल्या जात आहेत. तशीच प्रणाली ट्रॅक्टरला वापरणे शक्य होणार आहे. त्यामुळे कार पेक्षाही इलेकट्रीक ट्रॅक्टर उद्योगाला अधिक यश मिळणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे काम हे प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित असते. यात बॅटरी, इलेक्ट्रिक मोटर, आणि कंट्रोलर यांचा समावेश असतो. इलेक्ट्रिक मोटर, आणि कंट्रोलर यांबाबत कोणतीही समस्या नाही. मात्र ट्रॅक्टरला स्वस्त बॅटरी मिळणे ही समस्या असणार आहे. ही एक समस्या निकाली निघाली तर येणारा काळ हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा असणार आहे. असेही ट्रॅक्टर उद्योगातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.
आतापर्यत बनवलेले ट्रॅक्टर
देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) सोनालीका कंपनीने बनवला आहे. त्यांनतर HAV, Autonxt या कंपन्यांनी देखील आपले इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणले आहे. 2023 मध्ये वीएसटी टिलर्स एंड ट्रैक्टर्स ने VST Fieldtrack 929 EV इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. CSIR Prima ET 11 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील लॉन्च झाला आहे. याशिवाय अन्य काही कंपन्या देखील इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे मॉडेल बनवण्यावर काम करत आहे.