Electronic Soil : पिकांच्या वाढीसाठी ‘इलेक्ट्रॉनिक माती’चा शोध, 15 दिवसात पिके दुपटीने वाढणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा (Electronic Soil) वापर वाढला असून, कृषी क्षेत्रही त्यापासून वेगळे राहिलेले नाही. कृषी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वावर वाढलेला आहे. वेगवेगळी यंत्रे आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे आता शेती व्यवसाय करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मेहनत कमी झाली असून, उत्पादनही वाढले आहे. अशातच आता शास्त्रज्ञांनी चक्क विद्युत वाहक ‘इलेक्ट्रॉनिक मातीचा’ (Electronic Soil) शोध लावला आहे.

स्वीडीश शास्त्रज्ञांचा शोध (Electronic Soil For Crop Growth)

ऐकून विचारात पडला असाल. मात्र हे खरे असून, या इलेक्ट्रॉनिक मातीच्या मदतीने पंधरा दिवसात जवसाचे (बार्ली) पीक जेवढे सामान्य मातीत वाढते, त्यापेक्षा 50 टक्के अधिक वाढ या मातीत होऊ शकते. स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठातील संशोधक एलेनी स्टॅव्हिनिडो यांनी व त्यांच्या पथकाने या मातीचा शोध लावला आहे. खरे तर कृषी शास्त्रज्ञांनी हायड्रोपोनिक लागवड म्हणजेच मातीविना शेती तंत्रज्ञानासाठी विद्युत प्रवाहकीय लागवड सबस्ट्रेट विकसित केला असून, याला शास्त्रज्ञांनी इ-सॉईल म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक माती’ असे नाव दिले आहे.

‘इलेक्ट्रॉनिक माती’चे फायदे?

हायड्रोपोनिक्स फार्मिंग अर्थातच माती विना शेती ही शेतीची एक आधुनिक पद्धत आहे ज्यामध्ये पीक वाढीसाठी मातीची गरज लागत नाही. अशा प्रकारच्या शेतीमध्ये पाण्यातच पीक वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक दिले जातात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लेट्यूस, औषधी वनस्पती, स्ट्रॉबेरी, पालेभाज्या यांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. दरम्यान याच आधुनिक तंत्रज्ञानात अजून सुधारणा व्हावी यासाठी या नवीन इलेक्ट्रॉनिक मातीचा (Electronic Soil) शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.

कमी जागेत शेती करणे शक्य

जगातील लोकसंख्या वाढत असताना आणि हवामानातील बदलाचा शेतीवर परिणाम होत आहे. परिणामी अन्नाची मागणी पारंपरिक शेतीतून पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे ही भविष्यातील गरज म्हणून विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून हे संशोधन करण्यात आले आहे. मात्र आता या तंत्रज्ञानामुळे शहरी भागातही कमी जागेत शेती करणे शक्य होणार आहे. असे स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठातील संशोधक एलेनी स्टॅव्हिनिडो यांनी या संशोधनाबाबत म्हटले आहे.

error: Content is protected !!