Elephant Foot Yam: व्हेज मटन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘सुरणची’ अशी करा लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आरोग्यपूर्ण आणि चवीला खूपच स्वादिष्ट असणारे सुरण (Elephant Foot Yam) याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. सुरण मध्ये औषधी गुणधर्म सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात. या भाजीला गरीबाचे मटन (Veg Mutton) सुद्धा म्हणतात कारण भाजी दिसायला आणि चवीला मटनासारखी असते.

विदर्भातील काही भागात दसऱ्याला (Dasara Special Food) सुरणची (Elephant Foot Yam) भाजी करण्याची प्रथा आहे. कारण सुरण याला दैत्य समान समजून त्या दिवशी ही भाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. कदाचित या भाजीच्या आकारामुळे ही प्रथा पडली असावी.

या कंदवर्गीय पि‍काला (Tuber Crop) बाजारात भाव सुद्धा जास्त मिळतो शिवाय याची शेल्फ लाईफ सुद्धा जास्त असल्यामुळे इतर भाज्यांप्रमाणे खराब होण्याची भीती नसते. त्यामुळे शेतकर्‍यांना लागवड करण्यासाठी हे एक चांगले पीक आहे.

पीक लागवडीची सविस्तर माहिती (Elephant Foot Yam)

  • सुरण एक कंदवर्गीय पीक आहे. हे जमिनीच्या आत तयार होते. एप्रिल महिन्यात पेरणी केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पीक तयार होते.
  • सुरणच्या लागवडीसाठी वालुकामय व चिकणमाती असलेली जमीन योग्य मानली जाते.
  • शेत तयार करण्यासाठी सर्वात आधी शेताची खोल नांगरणी करावी, जेणेकरून शेतातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील. नंतर शेत थोडे कोरडे पडल्यावर रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करावी. अशा प्रकारे पूर्वमशागत पार पाडून शेत तयार करावे.
  • शेतात अंतिम नांगरणी करताना हेक्टरी 12 टन शेणखत टाकून पाटा चालवावा किंवा फळी मारून जमीन समतल करावी.
  • सुरण लागवडीसाठी संत्रागच्छी, कोऊ, श्री पद्या, श्री अधिरा, बिदानकुसूम, पालम’झिमिखंड-१ आणि गजेंद्र या वाणांची निवड करावी.
  • बियाणे लागवडीपूर्वी एका ड्रममध्ये 15 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून त्यात सुरणाच्या बिया म्हणजेच सुरणाचे तुकडे टाकावे. तसेच 10 मिनिटांनी बाहेर काढावे. ही प्रक्रिया तीन वेळा केल्याने बिया शुद्ध होतात. त्यामुळे रोगाचा धोकाही कमी होतो
  • पेरणीच्या वेळी शेतकरी सुरणाचे तुकडे शेतात दोन फूट अंतरावर लावावे. 2 किलो सुरणाचे चार भाग करून जमिनीच्या 1 इंच खाली खड्ड्यात लागवड करावी.
  • एक हेक्टरमध्ये सुमारे 140 क्विंटल बियाणे लावले जाते यातून तब्बल 500 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
  • बाजारात 40 रुपये प्रति किलो दराने सुरणची (Elephant Foot Yam) सहज विक्री होते.
error: Content is protected !!