Ethenol Price : इथेनॉल खरेदीच्या दरात वाढ करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील इंधन कंपन्यांनी इथेनॉल खरेदीच्या किमतीत (Ethenol Price) वाढ करावी, अशी मागणी इथेनॉल उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (GEMA) केली आहे. इथेनॉल खरेदीच्या दरवाढीसाठीची ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे. सरकारने त्वरित इंधन कंपन्यांना इथेनॉल दरवाढीबाबत (Ethenol Price) निर्देश द्यावे, असे असोसिएशनने आपल्या पत्रात म्हटले आहे.

देशात खराब झालेल्या अन्नद्यान्यापासून आणि विशेषतः मकापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली जाते. यंदाच्या 2023-24 या नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या इथेनॉल पुरवठा वर्षात अन्नधान्यापासून बनवलेल्या इथेनॉलला 69.54 रुपये तर मकापासून बनवलेल्या इथेनॉलला 76.8 प्रति लिटर दर देण्याची मागणी असोसिएशनने सरकारकडे केली आहे. इथेनॉल निर्मितीतील सातत्य राखण्यासाठी ही दरवाढ होणे आवश्यक असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

15 हजार कोटींची गुंतवणूक (Ethenol Price In India)

सरकारला पाठवलेल्या पत्रात असोसिएशनने म्हटले आहे, केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीतील वाढ करण्याच्या धोरणानुसार असोसिएशनच्या सदस्यांनी जवळपास 15 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. जी येत्या काळात आणखी वाढू शकते. 2025 पर्यंत 650 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असोसिएशनकडून ठेवण्यात आले आहे. मात्र, भारतीय अन्नधान्य महामंडळाने उद्योगाला तांदूळ पुरवणे बंद केले आहे. परिणामी खुल्या बाजारातून खराब अन्नधान्य आणि मकाच्या पुरवठ्यावर इथेनॉल उत्पादन केले जात आहे. मात्र उत्पादित इथेनॉलला योग्य तो दर मिळत नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

290 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तेल कंपन्यांना इथेनॉल उद्योगाने यावर्षीच्या हंगामात धान्यांद्वारे यंदा 290 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये 54 टक्के तांदळापासून (तुटलेला किंवा खराब तांदूळ), 15 टक्के भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून मिळणाऱ्या तांदळाद्वारे तर 31 टक्के मकाद्वारे इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे यंदा उद्योगाने मोठी गुंतवणूक केली असून, त्याच्या परताव्यासाठी केंद्र सरकारने इंधन कंपन्यांना इथेनॉल खरेदीच्या दरात वाढ करण्याचे तत्काळ निर्देश द्यावे, असेही संघटनेने म्हटले आहे.

error: Content is protected !!